भूदरगड तालुक्यात ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित कराडी. के. गोर्डे - पाटील.
भूदरगड तालुक्यात ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित कराडी. के. गोर्डे - पाटील.
-------------------------------------
गारगोटी प्रतिनिधी
स्वरूपा खतकर
-------------------------------------
गावातील सर्व ग्रामस्थांना संकट काळात मदत करण्यासाठी
ग्रामसुरक्षा यंत्रणा हा एकमेव खात्रीलायक उपाय असून नागरिकांनी याबाबत प्रशिक्षण व माहिती घेऊन सतर्क रहावे आणि आपल्यासह गावचे रक्षण करावे, असे आवाहन ग्रामसुरक्षा यंत्रणेचे संचालक डी. के. गोर्डे - पाटील यांनी डिजिटल स्क्रीनवर प्रात्यक्षिक दाखवले . ते पुढे म्हणाले या यंत्रणेमुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये संकट काळात स्वतःचे मोबाईलवरून सर्व गावकऱ्यांना एकाच वेळेस सूचना देता येणार आहे. न घाबरता ग्रामसुरक्षा यंत्रणेला फोन करा म्हणजे या यंत्रणेचा उपयोग होऊन त्वरित मदन मिळणार आहे.
भुदरगड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील गावांसाठी या यंत्रणेच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम खानापूर येथीलअशोका मल्टिपर्पज मंगल कार्यालयात झाला.यावेळी तहसीलदार अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक सचिन पाटील , गटविकास अधिकारी शेखर जाधव यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेबावत मार्गदर्शन केले.यावेळी नायब तहसीलदार सुशांत कांबळे, बाल विकास अधिकारी शितल पाटील ,मनसेचे युवराज येडूरे प्रमुख उपस्थितीत होते. सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल, तंटामुक्तीचे अध्यक्ष, शांतता कमिटी, महिला दक्षता समिती सदस्य, पोलीस मित्र, शिक्षक, विद्यार्थी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, ग्रा. पं. कर्मचारी, व्यवसायिक, बँक व सोसायटी संचालक, कर्मचारी, दुकानदार, पोलीस, होमगार्ड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील यांनी मानले.
Comments
Post a Comment