सांगलीसह कोल्हापूर शिरोळ, इचलकरंजी, हातकणंगलेला दिलासा, कर्नाटकमधील अलमट्टी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू..

 सांगलीसह कोल्हापूर शिरोळ, इचलकरंजी, हातकणंगलेला दिलासा, कर्नाटकमधील अलमट्टी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू..

-----------------------------------------

मिरज तालुका प्रतिनिधी 

राजू कदम

-----------------------------------------

अलमट्टी धरणातून सध्या 80 हजार क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळं सांगली आणि कोल्हापुरातील पुराचा धोका कमी झाला आहे. चांगल्या पावसामुळे अलमट्टी धरण सध्या 80 टक्के भरले आहे. अद्यापही पाऊस सुरूच आहे. कर्नाटक सरकार व महाराष्ट्र सरकार दोघांनी समन्वय राखून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळी सतत वाढ होत आहे. कृष्णा आणि वारणा या दोन्हीही नद्याच्या पाणी पातळी होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारी म्हणून अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला आहे. सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. 

सध्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नद्यांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कृष्णा नदी पात्र परिसरात संततधार सुरू असल्यानं कृष्णा नदीची पाणी पातळी संत गतीने वाढत आहे. दरम्यान, नदीकाठच्या  गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज ही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे..

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.