कुंभोज परिसरात भटकी कुत्री सोडण्याचा प्रयत्न नागरिकांनी हाणून पाडला, कुत्री सोडणाऱ्या वाहन व संस्थेवर कारवाई करण्याची मागणी.
कुंभोज परिसरात भटकी कुत्री सोडण्याचा प्रयत्न नागरिकांनी हाणून पाडला, कुत्री सोडणाऱ्या वाहन व संस्थेवर कारवाई करण्याची मागणी.
------------------------------------------
हातकणंगले प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------------------------
कुंभोज तालुका हातकणंगले येथे हिंगलजे मळा तसेच चौगुलेवाडी परिसरात हातकणंगले परिसरातील एका नामांकित कॉलेज परिसरातील एका चार चाकी वाहनातून मोकाट कुत्री सोडण्याचा प्रयत्न झाला परिणामी कुंभोज येथील जागृत नागरिकांच्या धाडसामुळे हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला.
परिणामी हातकलंगले सह परिसरात असणाऱ्या अनेक नामांकित कॉलेज परिसरात सध्या भटक्या कुत्र्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून येथील काही सुज्ञ नागरिकांनी ती भटकी कुत्री पकडून कुंभोज व परिसरात सोडण्याच्या साठी एक चार चाकी बंदिस्त वाहन पाठवले होते. सदर वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री कोंडून घालण्यात आली होती. सदर वाहन कुंभोज येथील हिंगलजे मळा, एम एस ई बी परिसरात कुत्री सोडण्यासाठी आले असता परिसरात असणाऱ्या खोत परिवारातील काही नागरिकांनी त्याला विरोध केला व तिथून त्यांना हाकलून लावले, परिणामी हे वाहन दुधगाव रोडवरील चौगुले वाडी परिसरात गेली असल्याची माहिती नागरिकांना मिळाली नागरिकांनीही त्याचा पाठलाग केला.
भटकी कुत्री वारंवार कुंभोज परिसरात कोण सोडते याबाबत नागरिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायत कुंभोज याचेकडे तक्रार ही दिल्या होत्या, परिणामी आज त्याचा उलगडा झाला परिणामी ग्रामपंचायत कुंभोज यांनी त्या वाहनावर व भटकी कुत्री ऐझसोडणाऱ्या संस्थांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी कुंभोज परिसरातील नागरिकांच्यातून सध्या जोर धरत आहे. परिणामी याबाबत नागरिकांनीही कुत्री सोडणाऱ्या संस्थांना जाब विचारणे गरजेचे असून भटक्या कुत्र्यांच्या मुळे कुंभोज परिसरात अनेक लहान मुले व महिलांना त्रास झाला आहे.
Comments
Post a Comment