काळम्मावाडी योजनेद्वारे दुपारपर्यंत पाणी पुरवठा करण्याचे युध्दपातळीवर प्रयत्न सुरु.
काळम्मावाडी योजनेद्वारे दुपारपर्यंत पाणी पुरवठा करण्याचे युध्दपातळीवर प्रयत्न सुरु.
-----------------------------------
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार.
-----------------------------------
कोल्हापूर ता.27: काळम्मावाडी येथे वीज वाहिनीचे दुरुस्तीचे काम अंतिम टप्यात असून दुपार पर्यंत हे काम पुर्ण होवून काळम्मावाडी योजनेतून पाणी पुरवठा सुरू करण्याचे काम महापालिकेच्यावतीने युद्धपातळीवर सुरू आहे. या योजनेतील २० कि.मी. लांबीचे वीज वाहिनी तपासणीचे काम काल सायंकाळी पुर्ण झाले असून ७ कि.मी. लांबीचे वीज वाहिनी तपासणीचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. हे काम दुपारपर्यंत पुर्ण करुन शहराला काळम्मावाडी योजनेद्वारे पाणी पुरवठा करण्याचे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे नियोजन सुरु आहे.
तसेच सध्या बालिंगा उपसा केंद्रातील ३०० एच.पी. पंपसेट सुरू असून यामधून शहराला पाणी उपसा सुरू आहे. सदरचा पाणी पुरवठा हा सी, डी वॉर्ड व संलग्नीत फुलेवाडी रिंगरोड या भागात करण्यात येत आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी महापालिकेचे ४ व २६ टँकर भाडयाने महापालिकेने घेतले असून १५ टँकर बावडा फिल्टर हाऊस येथे व १५ टँकर कळंबा फिल्टर हाऊस येथे तयार ठेवण्यात आले आहे. या टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक अधिकारी,कर्मचारी व चावीवाले यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात मागणीप्रमाणे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तरी शहरातील नागरीकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरावे व नळाद्वारे येणार पाणी उकळून व गाळून प्यावे असे आवाहन महापालिका प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.
Comments
Post a Comment