सीएसआर फंडामधून मदत करु ईच्छूणा-यांनी उप-शहर रचनाकार यांना संपर्क करा.
सीएसआर फंडामधून मदत करु ईच्छूणा-यांनी उप-शहर रचनाकार यांना संपर्क करा.
--------------------------------------
रजनी कुंभार.
--------------------------------------
कोल्हापूर ता.27 - कोल्हापूर महापालिकेस सीएसआर फंडामधून मदत करु ईच्छूणा-या दानशूर व्यकती, संस्थांची मदत घेण्यासाठी उप-शहर रचनाकार रमेश मस्कर यांची नियुक्ती केली आहे. दरवर्षी महापूराच्या कालावधीमध्ये ब-याच संस्था व नागरीक महापालिकेस मदत करतात. यावर्षीही मदतीसाठी बरेच नागरीकांचे फोन प्रशासनास येत आहे. तरी शहरातील ज्या कोणी व्यक्तींना अथवा संस्थाना या फंडातून महापालिकेस मदत करावयाची आहे त्यांनी रमेश मस्कर मो.नं.9766532077/7276316434 या नंबरवर संपर्क साधावा. तसेच महापालिकेच्यावतीने सर्व निवारा केंद्रात नाष्टा व जेवण पूरविले जाते. या निवारा केंद्रातही बरेच नागरीक जेवण, चहा, नाष्टा पुरवठा करणेस व जनावरांसाठी चारा देण्यास इच्छूक आहेत. त्यांनी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय पाटील मो.नं.9766532051 याचेश संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment