राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या विकासासाठी आगामी विधानसभा निवडणुक लढविणार...... भाजपाचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई.

 राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या विकासासाठी आगामी विधानसभा निवडणुक लढविणार...... भाजपाचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई.


गारगोटी येथील संपर्क कार्यालयात मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक.

-------------------------------------

  गारगोटी प्रतिनिधी

स्वरुपा खतकर

-------------------------------------

      राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या विकासासाठी आगामी विधानसभा निवडणुक लढविणार असुन स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष व बिद्री साखर कारखान्याचे संचालक,माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई यांनी केले.

      गारगोटी येथे देसाई यांच्या कार्यालयात प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता , अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते, बिद्री चे माजी संचालक धोंडीराम दादा मगदुम होते.तर पांडुरंग सहकार समुहाचे प्रमुख प्रकाश कुलकर्णी, तालुका संघाचे माजी उपाध्यक्ष एम डी पाटील प्रमुख उपस्थित होते.

    देसाई म्हणाले की, कार्यकर्त्यांचा आग्रह सातत्याने असल्याने त्याचा पुर्णता विचार करून विधानसभा निवडणुकीची जोमाने तयारी करूया, तालुक्यातील बेरोजगारी व विकासात्मक राजकारणापेक्षा अन्य बाबीना महत्व दिल्याने मतदारसंघातील बरेच प्रश्न प्रलंबित राहिले आहेत त्यांना न्याय देण्याची भुमिका घेवून आम्ही विधानसभेची निवडणूक लढवण्यावर ठाम आहोत.माजी आमदार बजरंग देसाई यांच्या वर प्रेम करणार्या हजारो कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी विधानसभेच्या रिंगणात उतरत आहोत.

   जेष्ठ नेते व पांडुरंग सहकार समुहाचे प्रमुख प्रकाश कुलकर्णी म्हणाले की,बजुआण्णांनी आपल्या आमदारकीच्या काळात या मतदारसंघाला विकासाभिमुख केले तोच वारसा पुढे चालवण्यासाठी राहुल देसाई ना आमदार करूया.

  भाजपाचे तालुकाध्यक्ष अनिल तळकर म्हणाले की तालुक्यातील प्रत्येक सत्तेचे ठिकाणी देसाई गटाचे कार्यकर्त्यांना संधी देण्यात देसाई यांनी आक्रमक भुमिका घेतल्याने प्रत्येक सत्तेत आपल्याला वाटा मिळाला आहे मतदारसंघालाही अश्या युवा नेतृत्वाची गरज आहे.

   गारगोटी चे लोकनियुक्त सरपंच प्रकाश वास्कर म्हणाले की, राजकारणापेक्षा समाजकारण करणारे नेते म्हणून देसाई यांची ओळख असल्याने विधानसभेत बुलंद आवाज पाठवूया.

   भुदरगड तालुका संघाचे संचालक नारायण पाटील म्हणाले, देसाई गटाला पुन्हा एकदा वैभवशाली दिवस राहुल दादांच्या मुळे येणार असुन सगळ्यांनी ताकदीने कामाला लागुया.

     तालुका संघाचे माजी संचालक सदाशिव देवर्डेकर म्हणाले की ,आपली संम्पुर्ण मतदारसंघात ताकत वाढली असुन येणार्या विधानसभा निवडणुकीत दाखवून देवूया.

    यावेळी किरण कुरडे, सुनिल देसाई,दगडू राऊळ,सुरेश खोत यांची भाषणे झाली.

   बैठकीस बिद्रीच्या संचालक सौ.अरूधंती संदीप पाटील, युवा नेते शिवराज देसाई , तालुका संघाचे संचालक प्रताप मेंगाणे, बाबासाहेब जाधव भोई,सिराज देसाई,सागर भाट, संतोष चव्हाण, शुभम मगदुम ,संजय देसाई, एच डी देसाई , नारायण पाटील दिग्वीजय कुलकर्णी, दगडू राऊळ ,एम एम कांबळे ,रंगराव बावस्कर प्रमुख उपस्थित होते

 स्वागत व प्रास्ताविक बजरंग कुरळे यांनी केले तर आभार सुनिल खंटागळे यांनी मानले.



चौकट.........


     संपर्क दौरा सुरू.......

मतदार संघातून कार्यकर्त्यांनी आपल्याला विधानसभा लढविण्यासाठी आग्रह धरला असुन लवकरच आपण मतदार संघात संपर्क दौरा सुरू करणार असल्याचे श्री देसाई यांनी सांगितले.


फोटो...... गारगोटी येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील बैठकीत बोलताना राहुलदादा देसाई, शेजारी प्रकाश कुलकर्णी, धोंडीराम मगदुम, सरपंच प्रकाश वास्कर,संजय देसाई

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.