ऑटोची ट्रॅक्टरला धडक तीन ते चार शाळकरी मुलांसह ऑटो चालक जखमी.

 ऑटोची ट्रॅक्टरला धडक तीन ते चार शाळकरी मुलांसह ऑटो चालक जखमी.

---------------------------------- 

रिसोड प्रतिनिधी

 रणजीत  ठाकुर 

---------------------------------- 

 ट्रॅक्टर आडवा आल्याने ब्रेक मारून आटो थांबण्याचा प्रयत्न करीत असताना ऑटोची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक होऊन यामध्ये चार ते पाच शाळकरी मुलांसह ऑटो चालक जखमी झाल्याची घटना दिनांक 29 जुलै संध्याकाळी पाच वाजता रिसोड शहरातील लोणी मार्गावर बाजार समितीच्या गेटच्या बाजूला आर के ऑटोमोबाईल समोर घडली. रुपेश अशोक सरकटे असे ऑटोचालकाचे नाव असून तो गंभीरित्या जखमी झाल्याने त्यास रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता पुढील उपचाराकरिता त्याला वाशीम येथे हलविण्यात आले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रुपेश सरकटे हा शाळेतील मुलांना घेऊन लोणी फाटा येथून बस स्टँड कडे जात होता यादरम्यान अनंत कॉलनी कडे जाणाऱ्या मार्गावरून ट्रॅक्टर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला घेण्याकरिता वळले असत आर के आटोमोबाईल समोर सदर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडक बसली यामध्ये ऑटो पलटी होऊन झाल्याचे बघताच स्थानीय नागरिकांनी घटनेस्थळी कडे धाव घेत तातडीने सर्व ऑटो मधील विद्यार्थ्यांना व ऑटो चालकाला बाहेर काढून आटो सरळ केला व जखमींना रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले.अन्य जखमी बद्दल अद्याप माहिती मिळू शकली नाही या घटनेमध्ये ऑटोचे मोठे नुकसान झाले आहे. वृत्त लिहीपर्यंत घटनेची तक्रार पोलीस स्टेशनला देण्यात आली नव्हती.

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.