आगामी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राधानगरी, भुदरगड, आजरा मतदार संघातील महाविकास आघाडीची बैठक आदमापूर येथील हॉटेल डायमंड येथे पार पडली.
आगामी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राधानगरी, भुदरगड, आजरा मतदार संघातील महाविकास आघाडीची बैठक आदमापूर येथील हॉटेल डायमंड येथे पार पडली.
-------------------------------------------
गारगोटी प्रतिनिधी
स्वरुपा खतकर
-------------------------------------------
यावेळी जेष्ठ नेते मुकुंद दादा देसाई यांनी आजरेकरांना आवर्जून निमंत्रण देऊन विचारात घेतल्याबद्दल महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे आभार मानले तुम्ही घ्याल तो निर्णय वरिष्ठ नेते देतील तो आदेश पाळुया आणि महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणूया असा निर्धार व्यक्त केला .
गेले अनेक वर्ष काँग्रेस पक्षाचा वापर करून घेऊन अनेक लोक आमदार झालेत आमदार झाल्यानंतर त्यांनी काँग्रेस कसे संपवता येईल हेच काम केल्याचा घनागती आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोकुळचे माजी संचालक पि.डी.धुंदरे यांनी केला.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, बिद्रीचे संचालक आर. के.मोरे, जि.प सदस्य जीवन पाटील ,सत्यजित जाधव, सचिन घोरपडे, शरद पवार गटाचे मुकुंद देसाई,संतोष मेंगाने राधानगरीचे शिवसेनेचे प्रमुख सुरेश चौगुले ,कॉम्रेड सम्राट मोरे,श्रमिक मुक्ती दलाचे नेते संपत देसाई, के.के कांबळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली तर काहींनी संधी दिली तर निवडणूक लढवणार असल्याची इच्छा व्यक्त केली. उमेदवार हा काँग्रेस राष्ट्रवादी व उद्धव ठाकरे गटाचा असावा आणि तो काम करणारा प्रामाणिक व निष्ठावंत असावा, अशी भावना व्यक्त केली.यावेळी आ आजऱ्याचे नेते उदय पवार, रणजित देसाई, गोकुळ चे मां संचालक दिनकर कांबळे राधानगरीचे सुशील कुमार पाटील, वैभव तहसीलदार, रवी पाटील, बिद्रीचे संचालक डी.एस.पाटील,शरद पाडळकर, भुदरगड चे माजी जिल्हा परिषद सदस्य एस.एम.पाटील, बाबसो उर्फ बाबुल देसाई उपसरपंच कडगाव, नितीन बोटे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अविनाश शिंदे, तालुका संघाचे संचालक शहाजी देसाई सर ,शरद पवार गटाचे धनराज चव्हाण, अजित पाटील अध्यक्ष पर्यावरण सेल, चंद्र सरपंच प्रभाकर पाटील,ओबीसी सेल चे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब गुरव, युवक कार्याध्यक्ष संजय सरदेसाई, अमर बरकाले व महाविकास आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment