चंद्रपूर जिल्हा मध्ये तातडीने होमगार्ड भरती करा.
चंद्रपूर जिल्हा मध्ये तातडीने होमगार्ड भरती करा.
------------------------------------------
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
राहुल मेश्राम
------------------------------------------
सुरेश मल्हारी पाईकराव संस्थापक अध्यक्ष - सफेद झंडा कामगार संघटना जिल्हा चंद्रपूर.
आज दिनांक 16 जुलै 2024 रोजी सफेद झंडा कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांचा वतीने मा. पोलीस अधीक्षक साहेब जिल्हा चंद्रपूर यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली
आताच चंद्रपूर जिल्हा मध्ये पोलीस भरती झालेली आहे त्या पोलीस भरती मध्ये काही उमेदवार पात्र झाले तर काही उमेदवार भरती मध्ये अपात्र झाले आहेत. त्याच्या पदरी निराशा पडली आहे.
हि बाब सुरेश मल्हारी पाईकराव यांनी लक्षात घेता व चंद्रपूर जिल्हाची वाढती बेरोजगारी पाहुन त्यांनी पोलीस अधीक्षक साहेब चंद्रपूर यांना निवेदनाद्वारे मागणी केली की
आपण आपल्या स्तरावर चंद्रपूर जिल्ह्य़ामध्ये तातडीने होमगार्ड भरती करुन जे उमेदवार खताश झाले किंवा चंद्रपूर जिल्ह्य़ातील बेरोजगार युवकांना /युवतीना
त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा. अशी मागणी सफेद झंडा कामगार संघटनेचे वतीने करण्यात आली.
Comments
Post a Comment