जैताळ मध्ये एक जिवंत काडतुससह पिस्टल जप्त. चारजणांना अटक.
जैताळ मध्ये एक जिवंत काडतुससह पिस्टल जप्त. चारजणांना अटक.
-------------------------------
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार.
-------------------------------
कोल्हापूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर कडील पोलीस माहिती घेत असताना अक्षय सुतार व अजिंक्य सुतार दोघे रा. आपटेनगर कोल्हापूर यांचेकडे बेकायदेशीर पिस्टल असून ते दोघे दि.17.07.2024 रोजी कोल्हापूर ते इस्पुर्ली जाणारे रोडवर जैताळ, ता.करवीर गांवचे हद्दीत हॉटेल सासुरवाडी समोर विक्री करणेकरीता येणार असलेबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना खात्रीशीर माहिती मिळाली. मिळाले माहितीप्रमाणे पोलीस निरीक्षक . रविंद्र कळमकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, शाहुपूरी पोलीस ठाणेकडील सहा. फौजदार संदिप जाधव तसेच पोलीस अमंलदार विनोद चौगुले, संजय पडवळ, यशवंत कुंभार, विनोद कांबळे व रोहीत मर्दाने असे जैताळ, ता. करवीर येथे सासुरवाडी हॉटेलच्या आसपास सापळा रचून 01) अक्षय सचिन सुतार, व.व. 20, रा.जोतीबा मंदीर जवळ आपटेनगर कोल्हापूर व 02) अजिक्य अनिल सुतार, व.व. 22, रा. जोतीबा मंदीर जवळ म्हसवे, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर यांना ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यातील एक गावठी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत राऊंड ताब्यात घेतले तसेच अॅक्सेस मोपेडसह एकूण 1,05,200/रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन मुद्देमालासह त्यास ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांचे कब्जात मिळालेले गावठी बनावटीचे पिस्टल व जिवंत राऊड असा मुद्देमाल पवन कांबळे, रा. आपटेनगर कोल्हापूर याने विक्री करण्यासाठी दिले असून त्याने ऋतुराज इंगळे, रा. आपटेनगर कोल्हापूर याचेकडून घेतले असल्याची कबुली दिली. ऋतुराज इंगळे याने अमोल खंदारे, रा. सुर्वेनगर कोल्हापूर याचेकडून पिस्टल घेतले असल्याचे तपासात निष्पन्न झाले त्यांचा शोध घेतला असता 03) पवन धोंडीराम कांबळे, व.व. 27, रा. जोतीबा मंदीरजवळ आपटेनगर कोल्हापूर व 04) अमोल सुरेंद्र खंदारे, व.व. 28, रा. प्लॉट नं. 7/8 महावीर इग्लीश स्कुल समोर सुर्वेनगर कोल्हापूर हे मिळुन आलेने त्यांना देखील ताब्यात घेतले असून चारजणा विरुध्द इस्पुर्ली पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा पुढील तपास इस्पुर्ली पोलस करत आहेत .
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, शाहुपूरी पोलीस ठाणेचे सहा. फौजदार संदिप जाधव तसेच पोलीस अमंलदार विनोद चौगुले, संजय पडवळ, यशवंत कुंभार, विनोद कांबळे व रोहीत मर्दाने यानी केली.
Comments
Post a Comment