पावसाचा जोर कमी झाला असला तरी राधानगरी धरण परिसरात फक्त तीस मिलिमीटर पाऊस दोन स्वयंचलित दरवाजामधून भोगावती नदीपात्रात विसर्ग सुरू.

 पावसाचा जोर कमी झाला असला तरी  राधानगरी धरण परिसरात फक्त तीस  मिलिमीटर पाऊस  दोन  स्वयंचलित दरवाजामधून भोगावती नदीपात्रात विसर्ग सुरू.

------------------------------------

राधानगरी प्रतिनिधी

 विजय बकरे 

------------------------------------

राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणाचा चार स्वयंचलित दरवाजा  गुरुवारी अकरा वाजून पन्नास मिनिटा पर्यंत उघडले होते तर सायंकाळी साडेचार वाजता एक स्वयंचलित दरवाजा असे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले तर शुक्रवारी पहाटे पाच वाजता एक स्वयंचलित दरवाजा उघडला होता व शुक्रवारी दुपारी एक वाजता एक स्वयंचलित दरवाजा पावसाचा जोर कमी झाल्याने बंद झाला तर सायंकाळी 5:45 वाजता एक स्वयंचलित दरवाजा बंद झाला आहे तसेच चार  स्वयंचलित दरवाजे सध्या चालू असून धरण परिसरात पावसाचा जोर असल्याने आज शनिवारी सकाळी सहा वाजता 180 मिलिमीटर पाऊस झाला आज, शनिवारी सायंकाळी सात वाजता पावसाचा जोर कमी झाल्याने फक्त तीस मिलिमीटर पाऊस झाला असल्याने दोन दरवाजे बंद झाले आहेत त्यामुळे दोन दरवाजे चालू असून भोगावती नदीपात्रात विसर्ग सुरू असल्याची माहिती भोगावती पाटबंधारे खात्याचे अधिकारी प्रवीण पारकर यांनी दिली  


अधिक माहिती अशी की राधानगरी धरण परिसरात पावसाने धुमाकूळ घातला असल्यामुळे राधानगरी धरण गुरुवारी सकाळी पूर्ण क्षमतेने भरले असल्याने राधानगरी धरणाचा  सकाळी दहा वाजून पाच  मिनिटांनी ते अकरा वाजून पन्नास मिनिटांनी पर्यंत चार स्वयंचलित दरवाजे उघडले तर सायंकाळी साडेचार वाजता एक स्वयंचलित दरवाजा असे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले होते व शुक्रवारी पहाटे पाच वाजता एक स्वयंचलित दरवाजा उघडला असून असे सहा स्वयंचलित दरवाजे उघडले  होते धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाल्याने शुक्रवारी दुपारी एक वाजून चार मिनिटांनी एक तर सायंकाळी 5:45 मिनिटांनी एक  स्वयंचलित दरवाजा असे दोन दरवाजे बंद झाले आहेत  तसेच आज शनिवारी धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाल्याने सायंकाळी सात वाजता दोन स्वयंचलित दरवाजे बंद झाले असून धरणाचे दोन  स्वयंचलित दरवाजे चालू असल्याने धरणाची पाण्याची पातळी 346. 77 तर पाणीसाठा , 8221.49 दशलक्ष घनफूट व आज सायंकाळी चार वाजता 30 मिलीमीटर पाऊस झाला असून  धरण 100 टक्के भरले तर दोन स्वयंचलित दरवाज्यातून प्रति सेकंद 2856 क्यूसेस पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे तर , बी ओ टी विद्युत गृहा मधून पंधराशे क्यूसेस असा एकूण 4356 क्यूसेस पाणी नदीपात्रामध्ये विसर्ग होत असल्याने नदीपात्रामध्ये पाणी प्रचंड प्रमाणात वाढत असल्याने नदीकडच्या लोकांनी सावधगिरी बाळगावी असे आव्हान भोगावती पाटबंधारे खात्याचे अधिकारी प्रवीण पारकर व राधानगरीच्या तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांनी केले आहे

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.