श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड मध्ये वृक्षारोपण तसेच पाचवीच्या विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग वाटप.
श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड मध्ये वृक्षारोपण तसेच पाचवीच्या विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग वाटप.
-------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीतसिंह ठाकुर
-------------------------------
श्री शिवाजी विद्यालय व क.महाविद्यालया मध्ये इयत्या पाचवीमध्ये नव्याने प्रवेशीत झालेल्या विद्यार्थ्यांना श्री शिवाजी शिक्षण संस्था वाशिम च्या वतीने पुरविण्यात आलेल्या स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले तसेच पर्यावरण पूरक वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक शाळा समितीचे संचालक पंजाबराव देशमुख हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. स्नेहदिपभभैया सरनाईक, प्रा.प्रद्युत देशमुख प्राचार्य संजयराव देशमुख, उपप्राचार्य संजयराव नरवाडे, पर्यवेक्षक गजानन भिसडे,उर्दू प्राथमिक चे मुख्याध्यापक अनिस खान यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेचे प्राचार्य संजयराव देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविकपर अभिभाषणामध्ये शाळेच्या प्रगतीचा आलेख सादर केला. पंजाबराव देशमुख यांनी जीवन चक्राच्या साखळीतील वृक्षांचे महत्व आपल्या संत साहित्याच्या अभ्यासपूर्ण शैलीतून विद्यार्थांना पटवून दिले. यानंतर मंचावरून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वर्ग ५ वी मध्ये नव्याने प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना श्री शिवाजी शिक्षण संस्था,वाशिमच्या वतीने मोफत स्कूल बॅग चे वितरण करण्यात आले. यावेळी डॉ.स्नेहदिपभैय्या सरनाईक यांनी विद्यार्थांनी सर्वसमावेशक तथा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शालेय शिक्षण तसेच शाळाबाह्य शिक्षण यांचा समन्वय साधण्यासाठी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास शाळेतील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. विजय देशमुख यांनी केले. कार्यक्रमाची सांगता मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणाने झाली.
Comments
Post a Comment