खोची बंधारा दुसऱ्यादा पाण्याखाली नागरिकांना दक्षतेचा इशारा.
खोची बंधारा दुसऱ्यादा पाण्याखाली नागरिकांना दक्षतेचा इशारा.
---------------------------------------------------
हातकणंगले प्रतिनिधी
विनोद शिंगे
---------------------------------------------------
बुधवारी सायंकाळपासून वारणा धरण क्षेत्रासह खोची परिसरात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे हातकणंगले तालुक्यातील खोची परिसरातून वाहत असलेल्या वारणा नदीचे पाणी शुक्रवारी सकाळी दुसऱ्यांदा पात्रा बाहेर पडले.यामुळे खुला झालेला खोची-दुधगांव दरम्यानचा बंधारा पुन्हा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला. या मार्गावरील वाहतूक नवीन पुलावरून सुरळीत चालू आहे.सतत पडत असलेल्या पावसामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढच होत आहे.शुक्रवारी सकाळपासून शनिवारी दुपारपर्यंत सात ते आठ फुटाणे धारेवर पाणीपातळीत वाढ झाली आहे.
त्यामुळे नदीकाठाची शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. जोरदार पाऊस पडत असल्याने शेतातून पाणी वाहू लागले आहे.
खोची हे वारणा नदीच्या पुराच्या पाण्याचा फटका बसणारे पूरग्रस्त गाव असल्याने प्रथम बाधित होणारी कुटुंबे सावध झाली आहेत.वाढत्या पाण्याच्या पार्श्वभूमीवर कुंभोज मंडल अधिकारी राजश्री पचंडी,तलाठी प्रमोद पाटील,ग्रामविकास अधिकारी आर.
एस.मगदूम यांनी भैरवनाथ मंदिर, खोची बंधारा, पाणी पात्रा बाहेर पडून प्रथम बाधित होणाऱ्या घराच्या ठिकाणाची पाहणी करून नागरिकांना सर्तक राहण्याचे आवाहन केले. जोरदार सुरू असलेला पाऊस व मोठ्या प्रमाणात वाढत असलेले वारणा नदीचे पाणी यामुळे प्रशासन सतर्क झाले असून महसूल व ग्रामपंचायत प्रशासन वाढत्या पाणी पातळीवर लक्ष ठेवून आहे.
फोटो- पाण्याखाली गेलेला खोची बंधारा
Comments
Post a Comment