मुरगुड नगरपालिकेला विविध मागण्यांचे निवेदन सादर.
मुरगुड नगरपालिकेला विविध मागण्यांचे निवेदन सादर.
-----------------------------------
मुरगूड प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
------------------------------------
शिवभक्त समाजसेवक मुरगूड यांच्या वतीने मुरगुड शहरातील विविध मागण्यांच्या अनुषंगाने मुरगुड नगरपालिकेस निवेदन सादर करण्यात आले नगरपालिकेच्या वतीने यांनी ते निवेदन स्वीकारले. शहरांमधील खुलेनाट्यगृह आहे सर्वसामान्य नागरिकांना कमी दरामध्ये कार्यक्रम करण्यासाठी उपलब्ध असताना ती जागा सध्या पार्किंगची जागा म्हणून वापरली जात आहे तसेच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होणारा कचरा याकडे देखील नगरपालिकेचे अक्षम दुर्लक्ष होत आहे त्याच्यावर योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात आली त्याचबरोबर तुकाराम चौक येथे देखील मोठ्या गाड्यांचे पार्किंग होत आहे तेथून नागरिकांना प्रवास करताना त्रास सहन करावा लागत आहे या मागणीकडे देखील शिवभक्तांनी लक्ष वेधले त्याचबरोबर शहरांमध्ये सध्या ड्राय डे म्हणून गुरुवार पाळला जातो या दिवशी पाणीपुरवठा बंद होतो मात्र सध्या मुरगुड तलावामध्ये पावसाळ्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा आहे यामुळे हा ड्राय डे रद्द करून आठवड्याचे साथी दिवस पाणीपुरवठा व्हावा या मागणी सोबतच पाणीपुरवठ्याचे वेळ देखील वाढवावा अशी मागणी शिवभक्त समाजसेवक मुरगुड यांच्यामार्फत करण्यात आली यावेळी नामदेवराव मेंडके, सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, दगडू शेणवी, संकेत शहा, सुभाष आनावकर, विक्रांत भोपळे, पृथ्वी चव्हाण, रणजीत मोरबाळे, निशांत जाधव यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment