राधानगरी तालुक्यातील कौलव येथे गुप्तधनासाठी अघोरी पूजा.सहा जणांना अटक.
राधानगरी तालुक्यातील कौलव येथे गुप्तधनासाठी अघोरी पूजा.सहा जणांना अटक.
-----------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
-----------------------------------
कौलव तालुका राधानगरी येथे गुप्तधनासाठी अघोरी पूजा करताना सहा जण मिळून आले या सहा जणांवर जादूटोणा कायद्याअंतर्गत कारवाई करून अटक करण्यात आली यासंदर्भात समजलेल्या हकीकत असे की कौलव येथील अजित राजाराम पाटील आणि सरपंच रामचंद्र कुंभार हे मंगळवारी संध्याकाळी सात वाजता शरद धर्मा माने राहणार कौलव यांच्या घराजवळ गेले असता त्यांच्या घरामधून मंत्रोच्चाराचे आवाज ऐकू येत असल्यामुळे त्यांनी घरात प्रवेश केले असता घरामध्ये प्रवेश केला असता तेथे एका चटईवर केळीचे पानावरती हळद-कुंकु सुपारी, नारळ पानाचे विडे, लिंबु त्याला टाचण्या मारलेल्या अशी पुजा सुरू असल्याचे दिसून आले तिथे चंद्रकांत मारुती धुमाळ राहणार कराड हा काही मंत्रोउच्चार करत असल्याचे निदर्शनास आले त्याने गळ्यामध्ये रुद्राक्ष व वेगवेगळ्या मण्यांच्या माळा घातलेल्या होत्या त्याचे शेजारी शरद माने हा बसलेला होता ते पाहता ते कृत्य अनिष्ट व आघोरी प्रथा व जादुटोणा असलेचे लक्षात आलेने फिर्यादी अजित पाटील आणि सरपंच रामचंद्र कुंभार हे आतील खोलीत गेले तेथे देव घराचे समोर अंदाजे तीन ते चार फुटाचा खड्डा काढला असल्याची त्यांना दिसून आली तसेच खड्डाचे बाजुला उकरलेली माती पडलेली दिसली म्हणुन अजित पाटील यांनी शरद माने यांना हा काय प्रकार चालू आहे ही कसली पुजा आहे असे विचारले त्यावर संतोष निवृत्ती लोहार राहणार वाझोली याने सांगितले की सदर खड्डा मध्ये गुप्तधन मिळणार आहे त्यासाठी हि पुजा करत आहोत असे सांगितले व सर्व आरोपींनी तुम्ही येथुन निघुन जावा अन्यथा तुम्हाला ठार मारिन अशी धमकी दिली यावरून फिर्यादी अजित राजाराम पाटील यांनी राधानगरी पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली त्यानुसार आरोपी शरद धर्मा माने रा कौलव ,महेश सदाशिव माने रा. राजमाची ता. कराड जि. सातारा, अशिष रमेश चव्हाण रा. मंगळवार पेठ कराड जि. सातारा , चंद्रकांत महादेव धुमाळ रा मंगळवार पेठ कराड जि. सातारा , संतोष निवृत्ती लोहार रा. वाझोली ता. पाटण जि. सातारा ,कृष्णात बापु पाटील रा. पुलाची शिरोली ता. हातकणगंले यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 351(2), 3 (5), महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा याना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, 2013 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे करीत आहेत.
Comments
Post a Comment