श्री.शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येवता येथे स्कुल बॅगचे वाटप हा कार्यक्रम संपन्न.
श्री.शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येवता येथे स्कुल बॅगचे वाटप हा कार्यक्रम संपन्न.
-------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीतसिह ठाकुर
-------------------------------
. :श्री.शिवाजी शिक्षण संस्था वाशिमचे अध्यक्ष तधा अमरावती विभागचे लोकप्रिय शिक्षक आमदार श्री.किरणरावजी सरनाईक साहेब यांच्या प्रेरणेने स्थानिक शाळा समितीचे अध्यक्ष महंत शांतीपुरी महाराज यांच्या शुभ हस्ते वर्ग ५वी तिल नविन प्रवेशित झालेल्या विद्यार्थांना स्कुल बॅग चे वाटप करण्यात आले .कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थान सन्माननीय महंत शांतिपुरी महाराज यांनी भुषवले .महंत शांतिपरी महाराजांचे स्वागत शाळेचे प्राचार्य श्री.विजयकुमार ढेंगळे सर यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले महंत शातीपुरी महाराज यांनी अध्यक्षीय भाषणातुन विद्यार्थिना दप्तराचे व पुस्तकांचे महत्व समजावुन सांगितले .कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व प्राध्यापक ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment