वाकद येथील श्री शिवाजी शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम
वाकद येथील श्री शिवाजी शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम.
-----------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीत सिंह ठाकूर
-----------------------------------
ठाकुर प्र श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाकद: येथे आज दिनांक 10 जुलै 2024 रोज बुधवार ला मा. प्रदीपरावजी देशमुख व डॉ.स्नेहदीपभैय्या सरनाईक यांच्या हस्ते शालेय परिसरात "वृक्षारोपण"करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व ऍडव्होकेट स्व.आप्पासाहेब सरनाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. तसेच मान्यवरांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्था वाशिम च्या संचालक पदी नियुक्त झाल्याबद्दल डॉ. स्नेहदीप भैय्या सरनाईक यांचे शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन माननीय प्रदीपरावजी देशमुख व सरपंच अमोलभैय्या देशमुख यांनी सत्कार केला.
श्री शिवाजी शिक्षण संस्था वाशिम व सामाजिक वनीकरण विभाग वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संरक्षण व वृक्ष संवर्धन मोहीम अंतर्गत श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाकद मध्ये मा.डॉक्टर स्नेहदीप भैय्या सरनाईक प्रदीप रावजी देशमुख,अमोल भैया देशमुख (सरपंच),प्राचार्य सुभाष उमाळे,प्रा.पी.देशमुख व ग्रामपंचायत सदस्य रऊफ भाई शिवाजी थोरात, प्रल्हाद बेंडवाले,रामचंद्र अंभोरे, भारत अंभोरे ,गौरव सरनाईक यांच्या हस्ते चिंच, सिताफळ तसेच विविध झाडांची शाळेच्या परिसरात वृक्षारोपण केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. स्नेहदीप भैय्या सरनाईक यांनी पर्यावरण संबंधी आपल्या झाडे किती महत्त्वाची आहेत.विदेशाच्या तुलनेत आपल्याकडे झाडे अधिक आहेत.
याचे संवर्धन करा हे सांगून शैक्षणिक कार्याबद्दल माहिती दिली.तसेच वाकद येथील सरपंच अमोल भैया देशमुख यांनी आपण शाळेत असताना स्वतः झाड लावून आपण जगवावे असा विद्यार्थ्यांना संदेश. दिला.कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात बोलताना मा.प्रदीपरावजी देशमुख यांनी प्रत्येकाने एक झाड लावावे असा दंडक शासनाने करावा अशी अपेक्षा व्यक्त करत वृक्षारोपण करणे, गावामध्ये झाडे लावणे ,शाळेमध्ये झाडांची निगा राखणे याबद्दल विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
याप्रसंगी प्रदीपरावजी देशमुख डॉ. स्नेहदीपभैय्या सरनाईक अमोलभैय्या देशमुख ,प्रा.पी.ए.देशमुख,गौरव सरनाईक ,ग्रामपंचायत सदस्य रऊफ भाई, शिवाजी थोरात ,प्रल्हाद बेंडवाले, रामचंद्र अंभोरे,भारत अंभोरे , पर्यवेक्षिका वर्षाताई देशमुख मॅडम व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन ओव्हर यांनी केले तर आभार प्रा. देविदास खरात यांनी मांनले.
Comments
Post a Comment