चिखली येथील इसमावर कुऱ्हाडी व कोयत्याने हल्ला रिसोड तालुक्यातील घटना.
चिखली येथील इसमावर कुऱ्हाडी व कोयत्याने हल्ला रिसोड तालुक्यातील घटना.
--------------------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीत ठाकूर
--------------------------------------------
दिनांक 08/07/2024 रोजी सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान चिखली तालुका रिसोड चे स्वाभिमानी व निर्भिड कार्यकर्ते दर्शन खोरने यांचे काका अमोल खोरणें व त्यांचे कुटुंब शेतात काम करत असताना शेताच्या वादावरून त्यांच्यावर प्राणघाती हल्ला झाला
हल्ला करणाऱ्यांचे नाव खंडूजी भिकाजी ढोक त्यांची पत्नी कुसुम खडूजी ढोक व त्यांचा मुलगा रामेश्वर खडूजी ढोक यांनी अमोल खोरने व त्यांची पत्नी मंगल अमोल खोरने व आई गंगुबाई रामप्रसाद खोरने व वडील रामप्रसाद नारायण खोरने यांच्यावर कोयता व कुऱ्हाड या शस्त्राने हल्ला केला
आरोपीचा मुलगा रामेश्वर खडुजी ढोक यांनी अमोल खोरणे यांना पाठीमागून डोक्याला कुऱ्हाड या धारदार शस्त्राने वार केला व खंडोजी भिकाजी ढोक यांनी अमोल खोरणे यांच्यावर समोर कोयता या धारदार क्षेत्राने डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला पण अमोल खोरने यांनी बचावासाठी डावा हात वरती केला तर खंडोजी बेकाजी ढोक यांचा केलेला वार अमोल खोरणे यांच्या डाव्या हातावर कोयता लागल्याने ते गंभीर जखमी झालेले आहेत व खंडूजी भिकाजी ढोक यांची पत्नी कुसुम खंडोजी ढोक यांनी अमोल खोरणे यांचे वडील रामप्रसाद नारायण खोरणे यांच्यावर मानेवर विळा या शस्त्राने वार केला व त्यांच्या मुलाने उजव्या पायावर कुऱ्हाड शस्त्राने वार केला
अमोल खोरणे यांची पत्नी मंगल अमोल खोरणे यांना खंडोजी भिकाजी ढोक यांची पत्नी यांनी जीवे मारण्याची धमकी दिली व त्यांना छातीवर कमरेवर पायाने मारले
या घटनेला 3 दिवस झाले असून तरी पोलीस प्रशासनाने आरोपीला अटक केली नाही व चिखली येथील धनगर समाज बांधव पोलीस प्रशासनावर पैसे घेऊन आरोपीची मदत करत असल्याचा आरोप करत आहे व रुग्णाचे नातेवाईक पोलिस प्रशासनासोबत चर्चा करताना पोलिस प्रशासन उडवा उडवीचे उत्तरे देत असल्याचा सुद्धा आरोप होत आहे सदर आरोपींना तात्काळ न्याय मिळावा अशी मागणी रिसोड तालुक्यातील धनगर समाज बांधवांकडून होत आहे याप्रकरणी कुटुंबाला योग्य तो निर्णय मिळाल्यास समाज रस्त्यावर उतरवणार असल्याचे दर्शन खोरणे यांनी म्हटले
Comments
Post a Comment