ढगाप्ळ वातावरणामुळे सोयाबीन वर किडीचा प्रादुर्भाव फवारणीचे प्रमाणात वाढ.
ढगाप्ळ वातावरणामुळे सोयाबीन वर किडीचा प्रादुर्भाव फवारणीचे प्रमाणात वाढ.
-------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीत सिंह ठाकुर
-------------------------------
मागील आठवडाभरापासून ढगाळ वातावरण असल्यामुळे सोयाबीनवर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे अति पावसामुळे पिके पिवळी पडली असून शेतकऱ्यांची फवारणीची लगबग वाढल्याचे दिसून येत आहे.
यावर्षी मान्सून वेळेत दाखल झाल्यामुळे पेरण्याही लवकर झाल्या आहेत सोयाबीन सह खरिपाची सर्वच पिके जोमदार आहेत मागील दोन-तीन दशकापासून खरिपातील सोयाबीन हे शेतकऱ्याचे मुख्य पीक झाले आहे यावर्षी मान्सून वेळेत दाखल झाल्यामुळे सोयाबीन सह इतर खरीपाच्या पिकांच्या पेरण्या वेळे आधीच झाल्यामुळे खरिपातील सर्वच पिके जोमदार आहेत परंतु मागील आठ ते दहा दिवसापासून ढगाळ वातावरण व रिमझिम पडत असलेल्या पावसामुळे पिकांची वाढ खुंटली आहे तसेच ज्या ठिकाणी पाणी साचून राहिले त्या ठिकाणची पिके पिवळी पडली असून शेतात तण वाढले आहे तन वाढल्यामुळे उत्पन्नात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे ढगाळ वातावरण व रिमझिम पावसामुळे सोयाबीन वर किडीचा ही प्रादुर्भाव वाढला आहे सततच्या पावसामुळे तणनाशक फवारणीचा काही उपयोग झाला नसल्याचे शेतकरी सांगत आहे ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून शेतकऱ्यांची फवारणीची लगबग वाढली आहे.
Comments
Post a Comment