मुरगुडमध्ये आषाढी एकादशी उत्साहात संपन्न.
मुरगुडमध्ये आषाढी एकादशी उत्साहात संपन्न.
--------------------------------------
मुरगूड /प्रतिनिधी
जोतिराम कुंभार
--------------------------------------
आषाढी एकादशीनिमित्त मुरगुड मधे उत्साही वातावरण पहावयास मिळाले मुरगुड येथील लिटल मास्टर गुरुकुलम सदाशिवराव मंडलिक संस्कार भवन शिवराज विद्यालय या शाळांनी विद्यार्थ्यांच्या आकर्षक आणि पारंपारिक वेशभूषा काढून वारी दर्शन घडवले यामध्ये लहानग्यांनी साकारलेली विठ्ठल रखुमाईची वेशभूषा सर्वांचे मन वेधून घेत होते. शहरांतील कुंभार गल्लीमधील विठ्ठल मंदिराची पालखीची नगर प्रदक्षिणा मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडली यावेळी येरुडकर कुटुंब , मकानदार कुटुंब बरकाळे कुटुंब यांनी वारकऱ्यांना खिचडी फराळाचे वाटप केले. शहरांमधील गावभागातून बस स्थानक जवाहर रोड ,नवी पेठ पोलीस स्टेशन , तुकाराम चौक मार्गे या दिंडीची सांगता मंदिराजवळ झाली. त्याचबरोबर नामदेव शिंपी समाजाच्या विठ्ठल मंदिरामध्ये देखील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. या दोन्ही विठ्ठल मंदिरांमध्ये पहाटे पूजा झाल्यापासूनच भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत होते मुसळधार पाऊस असून देखील पालखी नगरप्रदर्शनामध्ये भाविक मोठ्या संख्येने सामील झाले होते पावसामध्ये भक्तीरसामध्ये चिंब झालेले भाविक विठ्ठल भक्तीच्या अभंगांमध्ये रममान झाले होते. एकूण शहरांमध्ये आज आषाढी एकादशीनिमित्त भाविकांचा उत्साह पहावयास मिळाला. मुसळधार पाऊस असून देखील भाविकांचा हा उत्साह तसूभरही कमी न झाल्याचे पहावयास मिळत होते.
Comments
Post a Comment