डी मार्ट मध्ये लाहान मुलांच्या खाद्यपदार्थांमध्ये सापडल्या आळ्या.

 डी मार्ट मध्ये लाहान मुलांच्या खाद्यपदार्थांमध्ये सापडल्या आळ्या.

---------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी

शशिकांत कुंभार.

---------------------------------

डी मार्ट कोल्हापूर मध्ये लाहान मुलांच्या खाद्यपदार्थांमध्ये आळ्या सापडल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर तर्फे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले शहराध्यक्ष प्रसाद पाटील, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिजीत राऊत व मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी डी मार्ट वरती हल्लाबोल केला. अन्न व औषध प्रशासनाच्या शिंगटे व कदम या अधिकाऱ्यांसह बुरशीचं आळ्या सापडलेलं खाद्यपदार्थ खायला घालून मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांचा जाहीर निषेध केला. शाहूपुरी पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी प्रचंड पोलीस फोज फाटा तैनात करण्यात आला होता.

       यावेळी अन्न व औषध प्रशासनाकडून मनसेच्या दणक्याने आदेश देताच मनसे पदाधिकाऱ्यांनी डी मार्ट बंद करावयास लावली व अन्न व औषध प्रशासनाकडून सील करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. डी मार्ट सील करून अन्न व औषध प्रशासनाने त्यांच्यावरती खटला दाखल केला. 

         याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांनी कोल्हापूरच्या जनतेला आवाहन केले की कोल्हापुरातील जनतेने इथून पुढे डी मार्ट मध्ये खरेदी करू नये. बॅन डी मार्ट ही मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात यावी. इथून पुढे डी मार्ट वरती कायमस्वरूपी बंद करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकतीने तीव्र लढा उभा करेल.

या आंदोलनामध्ये जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले शहराध्यक्ष प्रसाद पाटील विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिजीत राऊत, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष अजिंक्य शिंदे, तालुका उपाध्यक्ष अरविंद कांबळे, शहर सचिव यतीन होरणे, संजय चौगुले, उत्तम वंदुरे, सॅम मुधळे, यश केंबळे, नितेश गणेशाचार्य, यश केंबळे, राघव सरदेसाई, निलेश आजगावकर, वैभव अस्वले , गणेश शिंदे, बाजीराव दिंडोर्ले,

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.