सांगली विधानसभा मध्य महिला राज्य येण्याची गरज-सौ नीता ताई केळकर.
सांगली विधानसभा मध्य महिला राज्य येण्याची गरज-सौ नीता ताई केळकर.
------------------------------
मिरज तालुका प्रतिनिधी
राजू कदम
-------------------------------
सांगलीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सांगलीमध्ये खूप काम करणे गरजेचे आहे. सांगली नाट्य पंढरी, आरोग्य पंढरी, साहित्य पंढरी, क्रांतिकारकांची चांगले असून सुद्धा विकासाच्या दृष्टिकोनातून पाठीमागे राहिली. सांगलीचा आकार कबशीसारखा असल्याने येणाऱ्या काळात महापुरापासून वाचवण्यासाठी 350 कोटीचा प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहे. सांगलीमध्ये आज अनेक एन ए प्लॉटच्या आजूबाजूला गुंठेवारी प्लॉटची निर्मिती झाल्यामुळे ड्रेनेज, रस्ते याची अवस्था खूप बिकट आहे. स्वच्छ- सुंदर सांगली साठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. महिलांसाठी उद्योग व्यवसाय निर्माण करणे गरजेचे आहे. महिला सक्षम असतात. त्या सर्व बाजूने विचार करून प्रमाणिकपणे काम करतात. गेले तीस वर्ष राजकारणाबरोबर समाजकारण करण्याचा योग आला. यातून एकच लक्षात आले आता सांगली विधानसभेवर महिला प्रतिनिधी गरजेची आहे. पक्षाने संधी दिली तर मी विधानसभेचे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. असे मत आपुलकीच्या कट्ट्यावरती पारावच्या गप्पागोष्टी मध्ये सौ नीता ताई केळकर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आयोजित युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष युवराज शिंदे यांनी केले. यावेळी रेखा पाटील, संगीता पाटील, विजय मला कदम, सुलोचना पवार, प्रमिला सावळे, हेमलता मदने, भारती पाटील, संतोष भुतेकर, व परिसरातील ज्येष्ठ मंडई मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आपुलकीच्या कट्ट्याचे अनेक कौतुक केले ...
Comments
Post a Comment