पुईखडी येथे रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.
पुईखडी येथे रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.
--------------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
विजय बकरे
--------------------------------------
कोल्हापूर येथील पुईखडी येथे आषाढी एकादशी निमित्त रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
या आषाढी एकादशी निमित्त विविध गावातून पालखी वाजत गाजत मिरवणुकीने नंदवाळ येथे प्रति पंढरपूर असणारे पांडुरंग विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर येथे जाणाऱ्या पालख्या पुईखडी येथे थांबून मेन मानाची पालखी आहे तिचे पूजन नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर व पत्नी यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी अश्वमेघ याचे पूजन नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर व खासदार शाहू महाराज आमदार ऋतुराज पाटील जि प सदस्य राहुल पाटील माझी पोलीस अधिकारी आर आर पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले त्यानंतर रिंगण सोहळा मध्ये अश्वमेघ रिंगण सोहळा पूर्ण केला त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातून अनेक भक्तमंडळी हा सोहळा पाहण्यासाठी आले होते तसेच ज्या ज्या गावातून पालकया आल्या त्या रोडवर राजगिरे लाडूशाबू खिचडी तसेच गोकुळ सुगंधी दूध खिचडी चे खाद्यपदार्थ लोकांना मोफत देण्यात आले या सोहळ्यामध्ये नंदवाळ प्रति पंढरपूर या मंदिराला नियोजन मंडळाच्या अध्यक्ष यांनी चांदीचे पालखी पांडुरंगाची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली यावेळी अनेक कोल्हापूर जिल्ह्यातून भक्तमंडळी या कार्यक्रमास हजर होते
Comments
Post a Comment