सांगलीत बॉडी बिल्डिंगसाठी उत्तेजक इंजेक्शन विकणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई. तिघांना अटक.
सांगलीत बॉडी बिल्डिंगसाठी उत्तेजक इंजेक्शन विकणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई. तिघांना अटक.
----------------------------------
मिरज तालुका प्रतिनिधी
राजू कदम
----------------------------------
सांगली: अमली पदार्थ विक्रीची अनेक प्रकरणे यापूर्वी उघड झाले आहे. आता सांगली परिसरात उत्तेजक इंजेक्शनची विक्री होत होती. मेफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शन हे बॉडी बिल्डिंग किंवा नशा करण्यासाठी वापरण्यात येते. शरीरसौष्ठवचा व्यायाम करणारे युवक व महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पिळदार स्नायूचे आकर्षण दाखवून त्यानंतर या नशेच्या इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या टोळीचा पदाफाश विटा पोलिसांनी केला आहे.
याप्रकरणी दिलीप बाबुराव ठोंबरे (व 48 रा, नेहरूनगर ,विटा) सुशांत हिंदुराव जाधव (वय 27 रा पुनदी रोड तासगाव मुळगाव हातनोली ) आणि अमरदीप रामचंद्र भंडा(रे वय 40 राहणार कार्व ता खानापूर ) या तिघांना अटक केली आहे. यावेळी त्यांच्या तब्येतीला मेफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शनची 8 हजार रुपये किमतीच्या 16 सीलबंद बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. विटा शहर व आसपास महाविद्यालय परिसरात युवकांना पिळदार स्नायूच्या आमिषाने मेफेनटरमाइन सल्फेट या नशाच्या इंजेक्शनची विक्री केले जात असल्याची तक्रार विट्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी हवालदार उत्तम माळी यांच्यासह पोलीस पथकाने तेथे सापळा लावला. त्यावेळी विटा येथे कंपाउंडचे काम करणारा दिलीप ठोंबरे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे मेफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या 16 सीलबंद बाटल्या सापडल्या त्यावेळी पोलिसांनी त्यांची कसं चौकशी केली असता या प्रकरणात त्याला मदत करणाऱ्या सुशांत जाधव व अमरदीप भंडारे या दोन साथीदाराची नाव निष्पन्न झाली.
मुख्य आरोपीला अटक करण्याचे पोलिसांसमोर आव्हान पोलिसांनी सुशांत जाधव याला तासगावमधून,तर अमरदीप भंडारे याला कार्व येथून अटक केली. पोलिसांनी तरुणांना बेकायदेशीर नसेच्या इंजेक्शनची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. मात्र हे इंजेक्शन संशयित तिघेजण कुठून खरेदी करीत होते. याचे मुख्य तपास करून त्यांच्याही मुस्क्या आवळण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. आरोपीकडून 145 इंजेक्शनच्या बाटल्या जप्त मेफेनटरमाइन सल्फेट या इंजेक्शनचा चा वापर हा हदय दाब वाढवण्यासाठी केला जातो. एमडी आणि एमबीबीएस पदवी असलेले डॉक्टरांच्या प्रिस्किप्शन शिवाय या इंजेक्शनची विक्री करता येत नाही. कोणते डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे औषध वापरल्यास विषारी द्रव्याचे परिणाम होऊन व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो किंवा आरोग्यास गंभीर होऊ शकतो.पोलिसांना या संदर्भात माहिती मिळाली. त्यानंतर मावळातील शिरगाव मध्ये उत्तेजक इंजेक्शन विकणाऱ्या दोघांना अटक केली. शिरगाव पोलिसांनी ही कारवाई केली आरोपीकडून 145 बाटल्या जप्त करण्यात आल्या...
Comments
Post a Comment