महापालिकेच्या गलथान कारभाराचा अनेकांना फटका : सर्जेराव खाडे.

 महापालिकेच्या गलथान कारभाराचा अनेकांना फटका : सर्जेराव खाडे.

----------–-------------------------

कोल्हापूर : प्रतिनिधी

----------–-------------------------

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला असून 


कोल्हापूर महानगपालिकेच्या गलथान कारभारामुळे शिंगणापूर च्या नदीवरील  धरणाचे  बरगे न काडल्याने कोल्हापूर पश्चिम भागात महापूर आला आहे.यामुळे अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे घरांचे नुकसान झाले आहे.सध्या काळमवाडी धरणातून पाणी पुरवठा सुरु आहे. तरीही येथील बरगे काढले नसल्याने अनेकांना फटका बसला आहे.


कोल्हापूर ला शिंगणापूर येथून पिण्याच्या पाण्याची सोय तात्कालीन मुख्यमंत्री कै.मनोहर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. यावेळी येथे बंधारा बांधून पाणी आडवणूक केले जात आहे. पावसाळ्यात सदरचे बरगे काढले जातात. पण गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेनै याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे पाण्याची तुंबी पश्चिमेला असणाऱ्या अनेक गावांना बसत आहे. यामध्ये प्रामुख्याने हणमंतवाडी,बालिंगा, दोनवडे, खुपीरे,वाकरे,कुडित्रे,सांगरुळ आदीसह पश्चिमेला याचा फटका बसत असतो.याबाबत वारंवार महापालिकेला कळवून दुर्लक्ष केले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

 त्यामूळे शेतीचे व शेतकऱ्यांचे खूपच नुकसान झाले आहे या शेतकऱ्यांचं व सामान्य माणसाच्या आर्थिक हानी ला जबाबदार कोण?यांना वाली कोण? असा प्रश्न अनेकांनी केला आहे.


         कोट

  महापालिका प्रशासनाने पावसाळ्यात शिंगणापूर नदीवरील बरगे काढले असते तर शेतकर्यांंचे नुकसान झाले नसते. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानभरपाई ची तजवीज महापालिकेने करण्यात यावी.

  सर्जेराव खाडे शेतकरी

  

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.