विद्यार्थिनींना शाळेतच मोफत एसटी पास चे वितरण.
विद्यार्थिनींना शाळेतच मोफत एसटी पास चे वितरण.
------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीत सिंह ठाकुर
------------------------------
महाराष्ट्र शासनाच्या वतीने शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थिनींना आता एस.टी.महामंडळाच्या वतीने मोफत पास थेट शाळेत वितरित करण्यात येणार या निर्णयानुसार दिनांक 1 जुलै 2024 रोजी रिसोड आगाराचे व्यवस्थापक दादाराव दराडे व त्यांचे सहकारी प्रशांत करे, अविनाश वंजारी, किशोर देशमुख यांनी येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन मुलींना मोफत पास वाटप केल्या.
नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा आता सुरु झालेल्या आहेत, आपल्या गावापासून ते शिक्षण घेत असलेल्या गावापर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थिनींना मोफत एस.टी.पासची सुविधा दिली असून, शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत 12 वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना या पासचे वितरण इथून पुढे शाळेत थेट केल्या जाणार होते, त्या अनुषंगाने दिनांक 1 जुलै 2024 रोजी श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये रिसोड एस.टी.आगाराचे व्यवस्थापक दादाराव दराडे यांनी स्वतः उपस्थित राहून आपल्या सहकाऱ्यांमार्फत विद्यार्थिनींना मोफत पास वितरित केल्या, यावेळी श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संजयराव देशमुख, उपप्राचार्य संजयराव नरवाडे, पर्यवेक्षक गजानन भिसडे, हे उपस्थित होते.
शाळेत मिळणाऱ्या मोफत पास मुळे विद्यार्थिनींना आता पास साठी रांगेमध्ये ताटकळत उभे राहण्याची आवश्यकता पडणार नाही त्यामुळे विद्यार्थिनी व त्यांचे पालक यांनी शासनाच्या या थेट पास पुरविण्याच्या योजनेचे कौतुक केले असून या योजने बाबत मिळणाऱ्या सुविधेमुळे समाधान व्यक्त केले आहे.
Comments
Post a Comment