कौलव येथे गुप्त धनाच्या हव्यासापोटी करण्यात आलेला अंधश्रद्धेचा प्रकार उघडकीस.

 कौलव येथे गुप्त धनाच्या हव्यासापोटी करण्यात आलेला अंधश्रद्धेचा प्रकार उघडकीस.

----------------------------------

कौलव प्रतिनिधी 

---------------------------------   

     कौलव ता राधानगरी येथे गुप्तधन प्राप्तीसाठी अंधश्रद्धेतुन भानामती प्रकारातून होणारे अघोरी कृत्य काल रात्री सरपंच रामचंद्र कुंभार यांच्या धाडसाने उघडकीस आले आहे.


      काल रात्री गावातील जागरूक नागरिकांनी शरद माने यांच्या घरी काहीतरी भोंदुबाबाच्या सहाय्याने काहीतरी भानामती प्रकार सुरू आहे असे सांगितले असता सरपंच रामचंद्र कुंभार यांनी जागरुकता दाखवित शरद माने यांच्या घरामध्ये गेले असता समोर चार ते पाच फुट खड्डा मारलेला दिसला, आणि एका चटईवर केळीच्या पानावर हळद कुंकू, सुपारी,नारळ,पानाचे विडे, टाचण्या मारलेले लिंबु, घेऊन सहा भोंदू महाराज मंत्र उच्चारत पुजा करीत होते त्यांच्या शेजारी शरद माने बसलेले होते यावेळी सरपंच कुंभार यांनी विचारना केली असता आम्ही सर्वजण गुप्तधनासाठी पुजा ‌करीत आहोत तुम्ही येथुन जावा नाही तर तुम्हाला ठार मारणेत येईल यावेळी सरपंच कुंभार यांनी फोनवरून पोलिस पाटील डी एस कांबळे, तंटामुक्ती अध्यक्ष विश्वास पाटील, सहकारी सदस्य अजीत पाटील, यांना बोलावून सदर प्रकार निदर्शनास आणून दिला आणि, राधानगरी पोलिस स्टेशनला कळविले असता तात्काळ राधानगरी पोलिस स्टेशनचे पोलीस दाखल झाले चालू असलेला प्रकार लक्षात येताच घर मालक शरद माने, भोंदू महाराज महेश सदशिव माने रा राजामाची ता कराड,अशिष रमेश चव्हाण,रा मंगळवार पेठ कराड, चंद्रकांत महादेव धुमाळ मंगळवार पेठ कराड, संतोष निवृत्ती लोहार,रा वाझोली,ता पाटण,जि सातारा, कृष्णात बापू पाटील रा पुलाची शिरोली,ता हातकणंगले यांना अटक करून यांच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास ठाणे अंमलदार गोरे करत आहेत

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.