विशाळगड येथील घटनेच्या निषेधार्थ एम आय एमची सांगलीत निर्देशने.
विशाळगड येथील घटनेच्या निषेधार्थ एम आय एमची सांगलीत निर्देशने.
--------------------------------------
मिरज तालुका प्रतिनिधी
राजू कदम
---------------------------------------
सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड आणि गजापूर येथे मुस्लिम बांधवांच्या घरावर हल्ला करून काही समाजकंटकांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या घटनेच्या निषेधार्थ सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एम आय एम पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेश कुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना देण्यात आले. विशाळगडावरील बेकायदेशीर अतिक्रमण व इतर चुकीच्या गोष्टींना अजिबात पाठिंबा नाही.
विशाळगड येथील हजरत मलिक रेहान दर्गाह हे सर्व धर्मीय लोकांचे पवित्र स्थान आहे. गडावरील काही घरे आणि दुकाने यांच्या अतिक्रमणाचा विषय उच्च न्यायालयात प्रलंबित असताना आणि ते करण्याबाबत न्यायालयाने स्थगिती दिली असताना छत्रपती संभाजी राजे, रवींद्र पडवळ, बंडा साळोखे यांनी चिथावणे दिल्यामुळे जातीयवादी प्रवृत्तींनी सदरची दगडफेक केले आहे. संभाजी राजे छत्रपती, राजेंद्र पडवळ आणि बंडा साळोखे यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी व नुकसानीचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी यास अन्य मागण्यासाठी सदरचे आंदोलन करण्यात आले..
Comments
Post a Comment