भारतीय सेना यांच्या वतीने पूरबाधित नागरिकांचे आरोग्य शिबिर आयोजित.

 भारतीय सेना यांच्या वतीने पूरबाधित  नागरिकांचे आरोग्य शिबिर आयोजित.

-----------------------------------------------

मिरज तालुका प्रतिनिधी 

राजू कदम 

-----------------------------------------------

सांगली: मा. आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी काही महिन्या पासून नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पूर ज्या भागात येणार त्या भागात पुराचे पाणी शिरणार तसे या भागातील नागरिकांचे स्थलांतर करून त्यांना निवारा केंद्रात सोय करणे त्याचा एक भाग होता, त्याबरोबर त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, त्याचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी नोडल अधिकारी यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. सांगली मिरज पूर भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले होते. 

सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, आरवडे प्लॉट, पटवर्धन प्लॉट, गोवर्धन प्लॉट, साईनाथ नगर, मगरमच्छ कॉलनी, कर्नाळा रोड, जगदंब कॉलनी, पंत लाईन, काका नगर इत्यादी ठिकाणी पूर बाधीत क्षेत्रातील नागरिकांना आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. मेजर डॉ. विनायक यांनी रुग्णाची तपासणी केली आहे. मनपा आरोग्य विभाग कडील डॉ. वैभव पाटील व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. 

सर्दी, खोकला किरकोळ आजाराचे 60 पेक्षा जास्त रुग्णांनी औषध उपचार या ठिकाणी घेतले आहे. नागरिकांची सोय या ठिकाणी चांगली झाली होती त्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे..

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.