एक हात मदतीचा.

 एक हात मदतीचा.

------------------------- 

कोल्हापूर प्रतिनिधी

------------------------- 

  भटक्या विमुक्तजमातीच्या फिरस्ती कुटुंबांना  आखेर " वंचित " ने दिला मदतीचा हात...

      कोल्हापूर जिल्हा व कोकण माथ्यावर होत असलेल्या अतिवृष्टी मुळे जिल्ह्यातील नद्यांनी रौद्र रूप धारण केले आहे. कोल्हापूर जिल्ह्याची जिवनदायनी असलेल्या पंचगंगा नदीने तर सीमाच ओलांडली होती.भर नागरी वस्तीत शिरून हाहाकार माजविला व अनेकांना स्थलांतर करण्यास भाग पाडले. पोटाची खळगी भरण्यासाठी शेकडो मैलाची पायपीट करीत तावडे हॉटेल जवळ झोपड्या मारून आश्रीत झालेल्या भटक्या व विमुक्त जमाती मधील फिरस्ती कुटुंबांना 'आश्रय तर सोडाच आश्रयदाता देखील सापडेना. चौफेर पाणी आल्याने रस्ते महामार्ग ही बंद झाली होती. धरणीमाता आश्रय देईना आणि आकाश थांबू देईना.अशा स्थिथित भटक्या विमुक्त जमातीमधील तब्बल 40 कुटुंबे आपल्या उघड्या नागड्या संसारासह कोसळणारा पाऊस अंगावर झेलत निवारा शोधत होती. महापालिकेशी संपर्क केले तर फिरस्ती असल्याने निवारा देण्यास स्पष्ट नकार दिला.अखेर वंचित बहुजन आघाडी चे करवीर ता.अध्यक्ष भिमराव गोंधळी, जिल्हा संघटक तानाजी काळे, शहर महासचिव मल्हार शिर्के, जिल्हा महासचिव महादेव कुंभार व जिल्हाध्यक्ष विलास कांबळे यांच्याशी संपर्क केला. त्यांनी महापालिका आयुक्त यांच्याशी संपर्क करून निवाऱ्याची व्यवस्था केली. पण तेथे ही रेशन कार्ड व आधार कार्ड नसल्याने पालिका कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले.अखेर जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले व आंदोलनाचे हत्यार उपसले त्यामुळे निष्ठूर बनलेल्या अधिकाऱ्यांनी नमते घेत त्या आश्रित कुटुंबाना अखेर निवाऱ्यासह सर्व जीवनावश्यक  सुविधा ही पुरविल्या.

     वंचित बहुजन आघाडी च्या सजग कार्यकर्त्यांच्या मुळे भटक्या विमुक्त जातीतील फिरस्ती कुटुंबांना अखेर निवारा मिळाला. यासाठी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विलास कांबळे, जिल्हा महासचिव महादेव कुंभार, करवीर तालुका अध्यक्ष भिमराव गोंधळी, जिल्हा संघटक तानाजी काळे, करवीर तालुका महासचिव अर्जुन गोंधळी, कार्यकर्ते शिवाजी कांबळे यांनी प्रयत्न केले.

   आज ही कोल्हापूर महानगरपालिकेकडून कुठल्याही प्रकारची सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत.त्यांना दोन वेळचे जेवण, नाष्टा , ब्लॅंकेट व जीवनावश्यक वस्तू अद्याप मिळत नसल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे तरी वंचित बहुजन आघाडीचे सर्व सहकारी मिळून त्यांना धान्याच्या स्वरूपात व आर्थिक मदत करीत आहेत.

🙏🙏

भिमराव गोंधळी.

तालुकाध्यक्ष

वंचित बहुजन आघाडी करवीर तालुका.

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.