महाविकास आघाडीच्या वतीने सांगली विधानसभेची उमेदवारी संजय बजाज यांना देण्यात यावी-उत्तमराव कांबळे.
महाविकास आघाडीच्या वतीने सांगली विधानसभेची उमेदवारी संजय बजाज यांना देण्यात यावी-उत्तमराव कांबळे.
---------------------------------
मिरज तालुका प्रतिनिधी
राजू कदम
---------------------------------
सांगली. महाविकास आघाडीच्या वतीने संजय बजाज यांना सांगली विधानसभेची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरचंद्र पवार पक्षाच्या वतीने पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष उत्तमराव कांबळे यांनी केली. यावेळी युवक शहर जिल्हा अध्यक्ष राहुल दादा पवार, सांगली विधानसभेचे अध्यक्ष सचिन जगदाळे, सेवा दलाचे अध्यक्ष महालिंग हेगडे, महिला आघाडीचे वंदना चंदनशिवे, सांगली शहर अध्यक्ष सागर घोडके, दत्ता पाटील, निलेश भाई शहा, वाजिद खतीब, पप्पू कोळेकर, जुबेर चौधरी, व कार्यकर्ते पदाधिकारी, उपस्थित होते.
Comments
Post a Comment