दारुच्या नशेत केला स्वताच्या गळ्यावर वार.

 दारुच्या नशेत केला स्वताच्या गळ्यावर वार.

------------------------------

राधानगरी प्रतिनिधी

विजय बकरे.

------------------------------

राधानगरी तालूक्यातील  सोन्याची शिरोली येथे  दारूच्या नशेत वस्तार्‍याने गळ्यावर कापून घेतलेल्याने एक जण गंभीर जखमी झाला. जयवंत बळवंत टिपूगङे वय (35) राहाणार सोन्याची शिरोली तालूका राधानगरी .जिल्हा .कोल्हापूर असे त्याचे नाव आहे. ही घटनां आज सकाळी  6 वाजण्याच्या सूमारास घङली.

  याबाबत अधिक माहीती अशी की   जयवंत  टिपूगङे याचे कसबा तारळे येथे सलून'चे दूकान आहे.  तो दारूच्या आहारी गेला होता. तो नेहमी घरी आला की   दारूच्या नशेत बङबङ करायचा. नेहमी घरी तो भांङणे करत असल्याने त्याची पत्नी सहा महीण्यापूर्वी  आपल्या मूलासह माहेरी गेली होती.  आज सकाळी  6 वाजण्याच्या सूमारास त्याने  आपल्या घरी  वस्तार्‍याने गळ्यावर  कापून घेतले. त्याला वेदनां होत असल्याने त्यांने ओरङाओरङ केली. ही घटना शेजार्‍यानां कळताच त्यांनी त्यांच्या घरात धाव घेतली आसता तो रक्तबंबाळ अवस्थेत पङलेला दिसला. लगेच त्यांनी त्याला उपचारासाठी राधानगरी येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्याला पूढील उपचारासाठी कोल्हापूरच्या शासकीय रूग्णालयात ( सी.पी.आर) पूढील उपचारासाठी पाटविण्यात आले असून त्याच्या गळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

   या घटनेची नोंद सी.पी. आर पोलिस चौकीत झाली आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.