विदेशी चलनाच्या नावावर गंडविणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश, तीन महिला अटक,२.७९ लाखाचा मुद्देमाल जप्त.

विदेशी चलनाच्या नावावर गंडविणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश, तीन महिला अटक,२.७९ लाखाचा मुद्देमाल जप्त.


------------------------------------

अमरावती जिल्हा प्रतिनिधी

पी.एन.देशमुख

------------------------------------

अमरावती.

अमरावती (दर्यापूर)

अमरावती जिल्ह्यात विदेशी नोटांच्या नावावर गंडविणाऱ्या आंतरराज्य टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा व दर्यापूर पोलिसांचा संयुक्त पथकाने, ३० जुलै रोजी पर्दाफाश केला. या टोळीतील तीन महिलांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून विदेशी नोटा, रोख व मोबाईल असा एकूण २ लाख ७९ हजार २५० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या टोळीतील पुरुष आरोपीचा शोध सुरू आहे. शांतामीर फिरोज मीर वय २७ गोपाल पुरी उत्तर दिल्ली, शिल्पी बेगम बुरहान शेख वय ४०रा. बेगूर, कर्नाटक व नदिया मोहम्मद इम्रान वय ३२रा.जे.जे. कॉलनी ब्लॉक, ई-बवाना, नॉर्थ वेस्ट दिल्ली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहेत. अमरावती जिल्ह्यातीलदर्यापूर येथील रहवासी उमेश सुरेश गावंडे वय ३८ त्यांच्या मिनी बँक ऑनलाईन सेंटरवर जाऊन दोन पुरुष व एक महिने आपल्या जवळील विदेशी नोटा दाखविल्या, त्या विदेशी नोटा भारतीय चलनात  बदलून देता काय, अशी विचारणा त्यांनी उमेश गावंडे यांना केली. उमेश गावंडे यांनी होकार दिल्यावर आरोपींनी त्यांच्याजवळु न ५० हजार रुपये घेतले. त्याचवेळी त्यांना एक बॅग देत त्यात विदेशी नोटा असल्याचे आरोपींनी त्यांनी सांगितले. दरम्यान, उमेश गावंडे यांनी बॅग बघितल्यावर त्यात चक्क रद्दी पेपर आढळले. आपली फसवणूक झाल्याची लक्षात आल्यावर उमेश गावंडे यांनी २८ जुलै रोजी दर्यापूर ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास आरंभला. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. तपासा सदत ठकसेनांची टोळी मुर्तीजापुर येथे वास्तवास असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलीस पथकाने मूर्तिजापुरातील चिखली मार्गावर आरोपी भाड्याने राहत असलेल्या खोलीवर धाड टाकली. यावेळी खोलीत सदर तिन्ही आरोपी महिला आढळून आल्यास. खोलीच्या झडतीत विदेशी नोटा, २ लाख ६५ हजार २५० रोख व १० मोबाईल असा २ लाख ७९ हजार २५० रुपयाचा मुद्देमाल आढळून आला. त्यानुसार पोलीस पथकाने मुद्देमाल जप्त करून तिन्ही महिला आरोपींना अटक केली. त्यांना पुढील कारवाईसाठी दर्यापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या टोळीतील पुरुष आरोपीचा शोध सुरू आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे, दर्यापूरचे ठाणेदार सुनील वानखडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक अभय चौथनकर, त्रंबक मनोहर, सुनील महात्मे, सय्यद अजमत, निलेश डोंगरे, उमेश वाकपांजर, प्रतिभा लुंगे, किरण सरदार, चेतन गुल्हाने, रितेश वानखडे यांनी केली

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.