केंद्रीय प्राथमिक शाळा नवीन इमारत बांधकामस अक्षम्य विलंब होत असल्याने आंदोलन.

 केंद्रीय प्राथमिक शाळा नवीन इमारत बांधकामस अक्षम्य विलंब होत असल्याने आंदोलन.

------------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

सांगवडे प्रतिनिधी 

विजय कांबळे

------------------------------------------

सांगवडे प्रतिनिधी /- गडमुडशिंगी तालुका करवीर केंद्रीय प्राथमिक शाळेसाठी नवीन इमारत मंजूर झाली असून त्यासाठीचा निधी सण 2020/ 21 मध्येच मंजूर झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. तशा बातम्या दैनिकातून छापूनही आल्या होत्या. तथापि गेले तीन-चार वर्षांमध्ये निधी मंजूर होऊन बाकी सर्व पूर्तता होऊन सुद्धा सदर इमारतीचे बांधकाम जाणीवपूर्वक रखडवण्यात आले आहे. गावामध्ये अनेक राजकीय गट आहेत या गटांतर्गत 

हेवी दाव्यातून आणि श्रेयवादी राजकारणातून सदर काम रखडण्यात आले आहे.

    सध्या ज्या इमारतीत मुलांना बसून शिकवण्यात येते ती इमारत पूर्णपणे खराब झाली असून. मुलांना त्या इमारतीत बसणे धोकादायक आहे म्हणून. त्याऐवजी सोयीनुसार ठीक ठिकाणी वेगवेगळे वर्ग भरवले जातात.  मुलांच्या शिक्षणाचे अत्यंत गैरसोय होते आहे पिण्याचे पाणी मुलींना बाथरूम मुलांना बाथरूम आधी बाबतील पूर्णतः गैरसोय होते त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे मराठी शाळेतील मुलांची पटसंख्या देखील घटत आहे. या सर्व बाबींचा विचार करून सदर मंजूर झालेल्या इमारतीत चे बांधकाम तात्काळ सुरू करणे अत्यावश्यक आहे वंचित बहुजन आघाडी २०२१ पासून बांधकाम सुरू ‌ व्हावे यासाठी पाठपुरवठा करत आहे  शाळेच्या कामास विलंब होत असून याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी केंद्रीय  प्राथमिक शाळेच्या आवारात दि-२२-७-२०२४ रोजी सकाळी ११ते ५ या वेळेत एक दिवसाचा लाक्षणिक उपोषण करत आहे याची नोंद घ्यावी ...!

निवेदन स्वीकारताना 

कातिॅकेयन एस.

मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.