बाहुबली मध्ये ब्र. अजितकुमार करके गुरूजी यांचा २४ वा स्मृतिदिन व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.
बाहुबली मध्ये ब्र. अजितकुमार करके गुरूजी यांचा २४ वा स्मृतिदिन व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.
-------------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
-------------------------------------
बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठ मध्ये ब्र. अजितकुमार करके गुरूजी यांचा २४ वा स्मृतिदिन व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.
अजित चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष रावसाहेब करके. किसान सह. दुध संस्था आळतेचे चेअरमन सुभाष करके यांनी या कार्यक्रमासाठी बहुमोल सहकार्य केले.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती संचालक गोमटेश बेडगे, बालविकास व प्राथमिक विद्यामंदिर बाहुबलीचे चेअरमन तात्यासाहेब अथणे,रावसाहेब करके,संजयकुमार पाटील, आण्णासो चौगुले, दीपक पाटील, दर्शन करके, रावसाहेब मगदूम, उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे, पर्यवेक्षक नेमिनाथ बाळीकाई, व्यवसाय विभाग प्रमुख अरुण चौगुले, तांत्रिक विभाग प्रमुख रविंद्र देसाई, अध्यापक - अध्यापिका, विद्यार्थी व आळते ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
अध्यापक बी डी माळी व नितीन मालगावे यांनी वृक्षारोपणाचे नेटके संयोजन केले होते. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.
Comments
Post a Comment