वर्ग २ जमिनीचा वाद निराकरण होणार.तहसीलदाराची ग्वाही.राष्ट्रवादी कॉग्रेस धरणे आंदोलनाचे फलित.

 वर्ग २ जमिनीचा वाद निराकरण होणार.तहसीलदाराची ग्वाही.राष्ट्रवादी कॉग्रेस धरणे आंदोलनाचे फलित.

----------------------------------------

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधि 

मंगेश तिखट 

----------------------------------------

चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बहुल म्हणून ओळख असलेल्या कोरपना तालुक्याच्या ठिकाणी भागातील समस्यांना वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आबिद अली प्रदेश सहसचिव यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले परिसरातील शेतकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येनी सहभागी होवून शासनाचे प्रशासनाचे लक्ष वेधले राजुरा उपविभागातील राजुरा,कोरपना,जिवती तालुक्यात वर्ग २ जमीन १ कामासाठी वाद २ दशकापासून सुरु आहे यामुळे शेतकऱ्याची पिळवणुक आर्थिक भुर्दंड तसेच चकरा काटण्यात वेळ जात आहे नागरिक त्रस्त आहेत कार्यालयातील चकरा व शासनाने ऑनलाईन करतांना वर्ग २ नोंदविल्याने शासनाने वेळोवेळी शासन निर्णय होवून सुद्धा प्रश्न सुटले नाही मोहीम राबवीत हा प्रश्न सोडवावा व ग्रामपंचायत तलाठी साजा निहाय वर्ग १ मोहीम राबवावी वन्यप्राण्यामुळे होणारे शेतकऱ्याचे नुकसान ७५% अनुदानावर पिक संरक्षणासाठी कुंपण झटका मशीन उपलब्ध करण्यात यावे आदिवासी पेसा क्षेत्रातील ३ पिढीचा पुरावा अट शिथिल करावी व गैरआदिवासींना जमिनीचे पट्टे वाटप करावे राष्ट्रीय महामार्ग जडवाहतुकीमुळे ग्रामीण रस्ते नादुरुस्त झाले ते तातडीने दुरुस्त करण्यात यावीत व जि.आर.आय.एल कंपनीने मंजूर क्षमतेपेक्षा अधिक उत्खनन कामाची चौकशी करावी जिवती-कोरपना तालुक्यातील जलजीवन मिशन निकृष्ठ कामाची व गैरव्यवहाराची चौकशी करावी संजय गांधी निराधार योजनेच्या बोगस लाभार्थी रद्द करावे या सह अनेक मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री,महसूल मंत्री,वनमंत्री,विभागीय आयुक्त यांना तहसीलदार कोरपना मार्फत देण्यात आले यावेळी शिष्ट मंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे स.आबिद अली, महादेव साखरकर,संजय पिंपळशेंडे,महादेव पेंदोर,धनराज जीवने,विवेक वडस्कर,मोहब्बत खान मारोती खापने विकास टेकाम नादिर कादरी शहेबाज अली,हिरालाल चव्हाण, भाऊराव ठाकरे, चंद्रभान तोडासे, लक्ष्मन मोहितकर यांच्या सह अनेक शेतकरी उपस्थित होते यावेळी तहसीलदार मा.व्हटकर यांनी वर्ग २ जमिनीचा भूमिधारी बाबत गावनिहाय्य नियोजन करून प्रकरण निकाली व हि मोहीम आँगस्ट महिन्यापासून सुरु करण्यात येईल वन्यप्राणी व पंचनामे संबंधात वनविभागाला योग्य सुचना करण्यात येईल आपल्या निवेदनातील स्थानिक प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्याचे आश्वासन दिले व तहसिलविभागाचे प्रश्नावर तातडीने कार्यवाही करण्याचे शिष्ठमंडळाला आश्वासित केले यावेळी अनेक शेतकऱ्याचे प्रश्न तहसीलदारांनी समजून घेतले आंदोलन कर्त्यांनी घोषणाबाजी करित तहसीलकार्यालयासमोर धरणे दिले यावेळी पोलीस बंदोबस्त चोख होता . परिसरातील नागरिकांचे महत्वाचे प्रश्न आंदोलनात चर्चेला आल्यामुळे शेतकरी मागण्या शासनाने मान्य करण्याची मागणी केली

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.