लोहा इंग्रजी शाळेच्या नावाखाली विद्यार्थी-पालकांची दिशाभूल ;मान्यता वेगळीच नावाचा -बोर्ड दुसराच.
लोहा इंग्रजी शाळेच्या नावाखाली विद्यार्थी-पालकांची दिशाभूल ;मान्यता वेगळीच नावाचा -बोर्ड दुसराच.
-------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
लोहा प्रतिनिधि
अंबादास पवार
-------------------------
सीबीएससी -इंग्रजी माध्यमांच्या शाळा या नावाखाली शहरात काही जणांनी शिक्षणाचा बाजार मांडला असून पालक कोणतीही खातरजमा न करता आपल्या पाल्याना असा शाळेत भरमसाठ फिस देऊन प्रवेश देत आहेत .,पण त्या शाळेत भौतिक सुविधा आहेत की नाही .शाळेची खातरजमा केली जात नाही तसेच सीबीएससी ची मान्यता आहे काय (?) ,याची पडताळणी होत नाही.इंग्रजी माध्यमाच्या नावाखाली उठसूठ अनधिकृत बाजार मांडला जात आहे त्यावर शिक्षणविभागाने कोणतीही कार्यवाही करत नाही त्यामुळेच तालुक्यात अनेक अनधिकृत शाळा सुरू झाल्या आहेत. लोहा शहरात हळदव रोड येथे धान्य गोदामात इंग्रजी शाळा सुरू असून चौथी पर्यंत मान्यता असलेल्या या शाळेत चक्क दहावी पर्यंत वर्ग भरविले गेले अशी लेखी तक्रार करण्यात आली होती त्यावरून बिईओ कार्यालयाने ५ जुलै शुक्रवारी दोन केंद्रप्रमुखांच्या मार्फत
तपासणी केली सीबीएसई पॅटर्न .पायोनिअर पब्लिक स्कुल असा बोर्ड असलेल्या या शाळेस किंग्ज विसडम पब्लिक स्कुल नावाने मान्यता आहे .हे चौकशीत दिसून आले चौथी वर्गा पर्यंत मान्यता
पण सातवी पर्यंत वर्ग भरविले जात होते
लोहा शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांची शासनाच्या यु-डायस साईट वर पयोनिअर इंग्लिश स्कुल हे नाव नाही .किंग्ज विसडम पब्लीक स्कुल ही शाळा लॉक डाऊन नंतर चालवायला घेतली.मान्यता प्राप्त कायम विनाअनुदानित असलेली ही शाळा चौथी पर्यंत आहे पुढे नैसर्गिक वाढ मान्यता न घेताच या नाव बदललेल्या (
पयोनिअर ) शाळेत वर्ग सुरू आहेत.
पायोनिअर "या नावाने जाहिरात करणाऱ्या व तसा बोर्ड लावणाऱ्या शाळेची मान्यता किडस किंगडम पब्लिक स्कुल अशी आहे त्या शाळेची गटशिक्षणाधिकारी लोहा यांच्या आदेशानुसार ५ जुलै रोजी ब्रँच कन्या संकुलाचे केंद्र प्रमुख भगवान कदम व केंद्र प्रमुख ए वाय कावलगावकर तपासणी केली.त्यात प्रवेश निर्गम,हज्रेरी पट यावर विद्यार्थी नोंद नाही असे तपासणीत आढळून आले विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात ही अंत्यत गंभीर प्रकार असून पालक स्वतःच आपल्या पाल्याच्या आयुष्याशी खेळताना दिसत आहेत तपासणीत अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या .
भाजपा युवा मोर्चाचे बंडू वडजे यांनी जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी नांदेड याना ४ जुलै रोजी लेखी निवेदन देऊन गोदामात भरणाऱ्या या शाळेची चौकशी करण्याची मागणी केली होती त्यानंतर शिक्षण विभागाने चौकशी केली त्यात गंभीर स्वरूपकब्या त्रुटी आढळल्या . गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे हे स्वतः या शाळेची तपासणी करणार आहेत
----------/बॉक्स-----/
चौथी पर्यंत मान्यता
पण सातवी पर्यंत वर्ग
●सिबीएससी चा फलक - -टीसी मात्र जिल्हा परिषद व अन्य शाळेची
●शाळा मव्हे धान्याचे गोदाम
● शिक्षण विभागाने केली तपासणी
●इंग्रजी शाळेच्या मनमानी फिसवर आळा घाला
जागरूक युवकांचे तहसीलदाराना निवेदन
●खेड्यातल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाही-
तहसीलदार यांना निवेदन
-------------
बुडत्याच्या पाय खोलात अशी अवस्था
पयोनिअर या तथाकथित सीएसबीसी पॅटर्न शाळेच्या संचालकांची झाली आहे भरमसाठ फिस घेणाऱ्या या शाळा संचालकांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माझ्या शाळेत ऍडमिशन नाही.रिझर्ट कमी येतो तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेत टाका असा अनाहूत सल्ला एका प्रतिष्ठीत युवा नेत्याला दिला .त्या संचालका विरुद्ध अनेकांनी तक्रारी केल्या नंतर जागरूक तरुण कार्यकर्त्यांनी तहसीलदार परळीकर याना ५ जुलै रोजी लेखी निवेदन दिले
इंग्रजी शाळेत भरमसाठ फिस घेणे ,पालकांची लूट, सिबीएससी मान्यता नसतानाही फसविणारी जाहिरात करणे याची चौकशी करावी असा आशयाचे निवेदन युवा नेते गजानन पाटील कऱ्हाळे सुजित चव्हाण, सुनिल पवार,स्वप्निल पांचाळ,माधव पाटील जामगे,विशाल कोरडे, किरण राठोड, बालाजी मोरे, संतोष पवार, दिपक उंडाडे, प्रदीप पा वडजे, आनंदा कऱ्हाळे , अंगद जाधव यांनी दिले
Comments
Post a Comment