मोबाईल रिचार्ज मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ तरीही सर्व सामान्य नागरिक गप्प का?

 मोबाईल रिचार्ज मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ तरीही सर्व सामान्य नागरिक गप्प का?

------------------------------ 

हातकलंगले प्रतिनिधी

 विनोद शिंगे

------------------------------ 

      मोबाईल कंपन्यांनी आपल्या रिचार्ज मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली असून या वाढी बद्दल संपूर्ण देशभरात कोणत्याही पद्धतीचा आवाज उठवला गेला नाही. परिणामी शेतकऱ्यांनी एखाद्या शेतीमालाची किंमत दोन रुपये अथवा तीन रुपये वाढवली तरी या संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात आंदोलनाची लाट उभा राहते परंतु मोबाईलचे रिचार्ज 50 ते 100 रुपयांनी वाढले तरीही मात्र सर्वसामान्य ग्राहकांनी याबाबत कोणतेही तक्रार केली नाही. परिणामी मोबाईल कंपन्यांनी अचानक केलेली वाढ सर्वसामान्य ग्राहकाला न परवडणारी असताना सुद्धा ग्राहक तोंड दाबून सहन करत आहे. परिणामी इतर वेळी शेतीमालाच्या किमती वाढल्यानंतर दंगा करणारे सर्वसामान्य नागरिक मोबाईल रिचार्ज कंपनी केलेल्या वाढी नंतर गप्प का ?असा सवाल सर्वसामान्य शेतकरी वर्गातून निर्माण होत आहे.


         रिलायन्स जिओपाठोपाठ आता भारती एअरटेलनेही आपल्या विविध मोबाइल सेवांच्या दरांत १० ते २१ टक्के वाढ केली आहे. रिलायन्स जिओने  मोबाइल सेवांच्या दरांत वाढ करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर एअरटेलने दरवाढ जाहीर केली आहे. अडीच वर्षांत दूरसंचार सेवांच्या दरांत प्रथमच वाढ होत आहे. एअरटेलचे नवीन दर ३ जुलैपासून लागू होतील.


         रिचार्ज महाग का केला? एअरटेलने म्हटले की, दूरसंचार क्षेत्रास किफायतशीर व्यवसाय मॉडेल बनविण्यासाठी प्रतिवापरकर्ता महसूल  ३०० रुपयांपेक्षा अधिक असायला हवा. एआरपीयूचा हा दर नेटवर्क तंत्रज्ञान आणि स्पेक्ट्रमच्या गुंतवणुकीसाठी कंपन्यांना सक्षम करील. त्यातून गुंतवणुकीवर सामान्य परतावा मिळेल. जिओने एक दिवस आधीच दरवाढ जाहीर केली आहे. कंपनीने आपले प्रीपेड व पोस्टपेड प्लॅन १५ ते २५ टक्क्यांनी महाग केले आहेत. 

          व्होडाफोन आयडियाही करणार दरवाढ? व्होडाफोन आयडियाकडूनही दरवाढीची शक्यता आहे. कंपनीकडून लवकरच दरवाढीची घोषणा केली जाऊ शकते. दरवाढीनंतर एअरटेलचे बहुतांश मोबाइल प्लॅन जिओच्या प्लॅनपेक्षा महाग असतील.


      किती महागला रिचार्ज? - 

अमर्याद ‘व्हॉइस प्लॅन’चा दर १७९ रुपयांवरून १९९ रुपये होईल. २८ दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनच्या दरात २० रुपयांची वाढ झाली आहे. यात वापरकर्त्यास २ जीबी डाटाही मिळतो. - सुनील मित्तल यांच्या नेतृत्वाखालील भारती एअरटेलने म्हटले की, आम्ही प्रारंभिक पातळीवरील प्लॅनच्या दरांत कमीत कमी म्हणजेच प्रतिदिन ७० पैसे इतकी वाढ केली आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.