वाकत ग्रामपंचायतला प्रशासकाची नेमणूक करावी.लखनसिंह ठाकुर यांचे जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांना निवेदन.
वाकत ग्रामपंचायतला प्रशासकाची नेमणूक करावी.लखनसिंह ठाकुर यांचे जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांना निवेदन.
----------------------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीत सिंह ठाकुर
----------------------------------------------
रिसोड तालुक्यातील वाकद या ठिकाणी मागील अनेक महिन्यापासून ग्रामसेवक नसल्याकारणाने ग्रामस्थांना अनेक अडचणी चा सामना करावा लागत होता त्यानंतर ग्रामसेवक देऊनही कुठलीही काम वेळेवर न होता कामामध्ये दिरंगाई होत असल्या च्या तक्रारी ग्रामस्थांकडून होत आहेत गावामध्ये अनेक विकास कामांना पुरेसा निधी उपलब्ध झालेला आहे जसे की जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचण्याकरिता योजना आलेली आहे सदर कामाच्या निविदा सुद्धा निघून अनेक महिने झाले परंतु आत्तापर्यंत जलजीवन मिशन अंतर्गत असलेली पाईपलानचे काम पूर्णत्वास गेलेले नाही निविदा प्राप्त कंत्रातदाराने पाईपलाईन खोदकाम करण्याकरिता गावांमधील सर्वच गल्लीमधून रस्त्याचे खोदकाम करून ठेवलेले आहे एक महिन्यापासून पावसाळ्याची सुरुवात झालेली आहे कुठे कुठे रस्त्याच्या मधोमध पाईपलाईन करता केलेल्या खोदकामामुळे साचलेल्या चिखलामुळे गावांमधील ग्रामस्थांचा आरोग्याचा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे तसेच रोजचे दैनंदिन कामे करण्याकरत। साधे चालणे सुध्दा कठीण होत आहे ग्रामस्थांना विनाकारण मनस्ता होत आहे गावामध्ये विकास कामांना संपूर्ण खीळ बसलेली आहे त्यामुळे ग्रामस्थांकडून वाकद गावामध्ये प्रशासक ची नेमणूक करण्याबाबत मागणी होत आहे त्यामुळे वाकद ग्रामपंचायतला प्रशासकाची नेमणूक करण्यात यावी अशी निवेदनाद्वारे मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम, तालुका दंडाधिकारी रिसोड यांना लखनसिंह ठाकुर भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव (उ.भा.)यांनी केली आहे.
Comments
Post a Comment