उत्रे परिसरात रानटी डुक्करांचा धुमाकूळ.पाच एकरातील उसाचा फडशा ,वनविभागाने डुक्करांचा बंदोबस्त करण्याची मागणी.

 उत्रे परिसरात रानटी डुक्करांचा धुमाकूळ.पाच एकरातील उसाचा फडशा ,वनविभागाने डुक्करांचा बंदोबस्त करण्याची मागणी.

------------------------------

हातकणंगले/प्रतिनिधी

विनोद शिंगे

------------------------------

 पन्हाळा तालुक्यातील उत्रे येथील डोंगर परिसरात दहा ते बारा रानडुक्कराच्या कळपाने धुमाकूळ घातला असून डुक्करे हातातोंडाशी आलेला ऊस फस्त करत आहेत. सुमारे पाच एकरातील ऊसाचे डुक्कराच्या कळपाने नुकसान केले आहे. नुकसानीचा पंचनामा करून नुकसानभरपाई मिळावी तसेच वनविभागाने या रानटी डुक्करांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


पन्हाळा गडाच्या पायथ्याशी उत्रे निकमवाडी दरम्यान डोंगर परिसरातील वांजुळ वडा माळरान दरा नावाच्या शेतात गेल्या काही दिवसांपासून दहा ते बारा रान डुक्कराचा कळपाचा वावर आहे. हा कळप रात्रीच्या वेळी या परिसरात ऊस फस्त करत आहेत. डुक्करे ऊस निम्म्यातून चघळून खातात.या ठिकाणी डुकरांनी धुडकूस घातल्यामुळे सुमारे पाच एकर क्षेत्रातील दहा ते बारा शेतकऱ्यांच्या ऊसाचे नुकसान झाले असून त्यांना आर्थिक फटका बसला आहे. बळीराम पाटील, विठ्ठल पाटील, अर्जुन मगर, संजय पाटील, नामदेव पाटील, दगडु मगर, विलास चौगुले, दादासाहेब पाटील, प्रधान पाटील ,आदी शेतकऱ्यांच्या सुमारे पाच एकर ऊस शेतीचे नुकसान झाले आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी यांची त्वरित पाहणी करून पंचनामा करावा. नुकसान भरपाई द्यावी तसेच या डुक्करांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


फोटो ओळ:- उत्रे परिसरात रानटी डुक्कराच्या कळपाने ऊसाचे नुकसान केले आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.