केर्ली येथे महीला आरोग्य शिबीर संपन्न.
केर्ली येथे महीला आरोग्य शिबीर संपन्न.
-----------------------------------
कौलव प्रतिनिधी
संदीप कलिकते
-----------------------------------
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आरोग्य सुविधा महाग होत चालल्या आहेत त्यामुळे सर्वसामान्य रूग्ण आपल्या आरोग्याची काळजी घेत नाहीत,आजारपण अंगावर काढतात.म्हणुन केर्ली ता करवीर येथे चैतन्य संस्था राजगुरू पुणे प्रेरीत यशस्वी ग्रामीण महिला संघ करवीर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र भुये यांच्या वतीने महिलांच्या करिता मोफत महिला आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते
शिबिराची सुरूवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन एरिया व्यवस्थापक नुतन कांबळे आणि संघ व्यवस्थापीका सुजाता कलिकते यांच्या हस्ते करण्यात आले.स्वागत आणि प्रास्ताविक माधवी सुतार यांनी केले या शिबिरात ७५ महिलांची हिमोग्लोबिन,शुगर,थाॅयराईड, रक्तदाब यांची तपासणी करून मोफत औषधोपचार केले.या शिबीरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र भुयेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ शोभा सुर्यवंशी,लॕबटेक्नीशियन डॉ अक्षय जाधव यांचेसह आशा सेविका यांचे सहकार्य लाभले.यावेळी एरिया व्यवस्थापक नुतन कांबळे,संघ व्यवस्थापिका सुजाता कलिकते , कार्यकर्त्यां मनिषा शिंगाडे,शितल कुसाळे , पदाधिकारी रेश्मा गुरव,माधवी सुतार बचत गटाच्या सविता यादव, मिनाक्षी पाटील, सारिका कोपार्डे, वैशाली कोपार्डे,सरिता आसुळकर,विद्या आसुळकर, अनिता पाटील,पुनम गवसे, अश्विनी पाटील,विद्या सुतार, सुवर्णा कोपार्डे,कोमल पाटील, पूजा माने, आदिंसह असंख्य महिला उपस्थित होत्या.शेवटी आभार सविता यादव यांनी मानले
Comments
Post a Comment