हातकणंगले तालुक्यातील महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन- आमदार राजु बाबा आवळे.

 हातकणंगले तालुक्यातील महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन- आमदार राजु बाबा आवळे.

-----------------------------------------

हातकणंगले प्रतिनिधी

 विनोद शिंगे

-----------------------------------------

महाराष्ट्र राज्यातील महायुतीच्या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली.महायुतीचे सरकार हे नेहमीच महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना राबवत असते.त्याचप्रमाणे महायुतीच्या सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना' राज्यात सुरु केली.


        मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.महिलांच्या विकासासाठी महायुतीच्या सरकारने सुरू केलेल्या या योजनेचा हातकणंगले तालुक्यातील महिलांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन आमदार राजु बाबा आवळे यांनी केले.


       हातकणंगले पंचायत समितीकडून संभाव्य २लाख पेक्षा जास्त महिलांना  अशा हातकणंगले तालुक्यातील ३लाख महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार राजु बाबा आवळे यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.