अल्पवयीन मुलाच्या हत्येप्रकरणी काही तासातच आरोपींना अटक.
अल्पवयीन मुलाच्या हत्येप्रकरणी काही तासातच आरोपींना अटक.
--------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापुर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
--------------------------------------
इचलकरंजीतील शहापूर येथील सुशांत कांबळे या अल्पवयीन मुलाची आज सकाळी निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी काही तासातच शहापूर पोलिसांनी तीन आरोपींना जेरबंद केले.
अधिक मिळालेली माहिती अशी की स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी या गुन्ह्याचा तपास करण्याकरता दोन पथके तयार करुन पाठवली होती. काही तासातच या पथकांनी पुण्यातील आरोपींना जेरबंद केले. यामधील संशयित आरोपी अतीश नेटके ,आर्यन चव्हाण,प्रदीप पारस, सर्व राहणार इचलकरंजी हे सर्वजण कोल्हापुरातील राजाराम कॉलेजच्या मागच्या बाजूला आल्याची पोलिसांना माहिती मिळाली पोलिसांनी साफळा रचून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता. घोडा गाडी परत मागितलीच्या कारणावरून आणि जुन्या वादातून सुशांत ची हत्या केल्याची कबुली दिली. मुख्य आरोपी अतिशय सुशांत कांबळे यांचा चांगला मित्र होता.
सदरची कारवाई गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षण रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव आणि शेष मोरे शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर यांनी केली आहे
Comments
Post a Comment