71 वर्षानंतर श्रावणाची सुरुवात सोमवारी होणार ...!

 71 वर्षानंतर श्रावणाची सुरुवात सोमवारी होणार ...!

------------------------------------

भोकरदन।प्रतिनिधी 

------------------------------------

देवाधिदेव महादेवाची आराधना भाविक भक्त वर्षभर करित असतात. पण महादेवाला श्रावन महिना अतिशय प्रिय आहे.या महिन्यात दर सोमवारी विषेश अभिषेक पुजा करतात. यंदा 71 वर्षांनंतर हा दुर्मीळ योग्य आला असून श्रावणाची सुरुवात आणि शेवट सोमवारीच होणार आहेत. यापूर्वी1953साली हा दुर्मीळ योग्य आला होता यंदा श्रावानाला 5 ऑगस्ट सोमवारी सुरुवात होत असून तर सांगता 2 सप्टेंबर सोमवारी आहे .3 सप्टेंबर ला श्रावनी आमवस्या आहेत .श्रावनाच्या पहिल्याच दिवशी सोमवार येण्याचा 71 वर्षानंतरचा हा अतिशय दुर्मीळ योग्य आला आहे .यापूर्वी सोमवार 10 ऑगस्ट 1953 ला शेवटचा सोमवार आला होता अशी माहीती तडेगाव येथील  समर्थ पांडुरंग संस्थान चे पुजारी कोमल महाराज जोशी यांनी दिली 


*अठरा वर्षानंतर पाच श्रावनी सोमवार*

यंदाच्या श्रावणाची आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यंदा पाच श्रावनी सोमवार येणार आहेत. त्यामुळे भाविकांसाठी चांगली पर्वणीच ठरणार आहेत. याआधी असा योग्य 2006 साली यावर्षी आला होता .मागील वर्षी 2023 ला  अधिक मासामुळे श्रावन महिना दोन महिने होता या काळात श्रावन सोमवार आठ आले होते यंदाच्या श्रावनी सोमवारामधे पहिला सोमवार पाच ऑगस्ट ला आहे दुसरा 12 ऑगस्ट ला तिसरा 19 ला चौथा 26 ऑगस्ट पाचवा 2 सप्टेंबर रोजी आहेत. सर्वच भाविक येणार्या श्रावनी सोमवारा साठी चांगलेच उत्सुक दिसत आहेत.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.