रंकाळा हुपरी जनता गाडी क्षमता 60 ची प्रवासी 80 नागरिकांची कुचंबणा.
रंकाळा हुपरी जनता गाडी क्षमता 60 ची प्रवासी 80 नागरिकांची कुचंबणा.
-----------------------------
हुपरी प्रतिनिधी
जितेंद्र जाधव
-----------------------------------
रंकाळा हुपरी ही जनता गाडी कोल्हापूर ते हुपरी आणि हुपरी ते कोल्हापूर अशा फेऱ्या मारत असते या मार्गावर मोठी मोठी गाव आहेत रंकाळा हुपरी ह्या जनता गाडी मध्ये विद्यार्थी शासकीय कर्मचारी नोकरवर्ग महिला दिव्यांग व्यक्ती वयोवृद्ध लोक यांची दररोज कोल्हापुरात ये जा असते,
रंकाळा हुपरी ही जनता गाडी हुपरी येथून सुटली की पट्टणकोडोलीतच हाउसफुल होते प्रवासी 60 क्षमता असलेली ही बस 80 ते 90 प्रवाशांनी खचाखच भरलेली असते यामध्ये ज्यादा तर महिला असतात कारण त्यांना 50 टक्के तिकिटामध्ये सवलत आहे दिव्यांग व्यक्ती वयोवृद्ध लोक महिला यांना तर बसायला जागाच मिळत नाही त्यामुळे सांगवडे फाटा अमित स्पिनिंग मिल चव्हाणवाडी गडमुडशिंगी उंचगाव येथील प्रवाशांना ताटकळत बसावे लागते हुपरी रंकाळा जनता गाडी अनेक थांब्यावर न थांबता प्रवासी न घेता कोल्हापूरच्या दिशेने जात आहे तीच परिस्थिती कोल्हापूरहून हुपरी येताना होते रंकाळा दसरा चौक कमला कॉलेज यादरम्यान गाडी हाउसफुल होते त्यामुळे पुढच्या प्रवाशांना बस मध्ये जागा मिळत नाही याचा परिणाम विद्यार्थी वर्ग वयस्कर लोक दिव्यांग व्यक्ती यांना होत आहे विद्यार्थ्यांना मग वडापाचा आधार घ्यावा लागत आहे त्यामुळे त्यांना ज्यादा भुरदंड सोसावा लागत आहे एसटी पास साठी पैसे खर्च केले असतानाही पुन्हा वडापसाठी दुहेरी खर्च करावा लागत आहे या मार्गावर केएमटी बसेस सुद्धा नाहीत त्यामुळे वडापवाले तेजीत आहेत त्यामुळे एसटी महामंडळाने ज्यादा एसटी सुरू करावी किंवा महानगरपालिकेने केएमटी बस सुरू करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे एसटी प्रशासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष घालून जनतेची होणारी ससेहोलपट थांबवावी
Comments
Post a Comment