राधानगरी धरण परिसरात मुसळधार पाऊस.धरण 50.29% भरले.
राधानगरी धरण परिसरात मुसळधार पाऊस.धरण 50.29% भरले.
--------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
--------------------------------
राधानगरी धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत असून राधानगरी धरण भरण्यास 27 फूट पाणी कमी असून धरण 50.29% भरले असल्याची माहिती भोगावती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली
याबाबत अधिक माहिती अशी की राधानगरी धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत असून धरणाची पाण्याची पातळी 320 पॉइंट 16 फुट पाणीसाठा 4205.51 दशलक्ष घनफूट असून धरण 50.29% भरले आहे तर आज सकाळी सहा पर्यंतचा पाऊस 89 मिलिमीटर तर एक जून 14 जुलै अखेर 1617 मिलिमीटर झाला आहे व विद्युत गृह तेराशे क्युशेस पाणी भोगावती नदीपात्रात सोडण्यात आले आहे गेल्या वर्षी 14 जुलै रोजी एकूण पाऊस 1029 मिलिमीटर झाला होता राधानगरी धरण भरण्यास 27 फूट कमी असल्याची माहिती भोगावती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली असून पावसाचे प्रमाण वाढत असल्याने नदीच्या पात्रामध्ये पाण्याची वाढ होत असल्याने, नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असे आव्हान पाटबंधारे खात्याकडून करण्यात येत आहे
Comments
Post a Comment