पूरग्रस्त नागरिकांना प्रत्येक कुटुंबाला 30 हजाराची तातडीने मदत करावी-उत्तमराव कांबळे (आबा)

 पूरग्रस्त नागरिकांना प्रत्येक कुटुंबाला 30 हजाराची तातडीने मदत करावी-उत्तमराव कांबळे (आबा) 

------------------------------------------

मिरज तालुका प्रतिनिधी

 राजू कदम 

-------------------------------------------

सांगली: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज साहेब व युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक न्याय विभाग सांगली शहर जिल्हाध्यक्ष उत्तमराव कांबळे (आबा) यांनी सांगली येथील नगरमच्छ कॉलनी व महापालिका शाळा क्र- 17 या ठिकाणी पूरग्रस्त नागरिकांची भेट घेऊन व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी उत्तम कांबळे यांनी पुरग्रस्त नागरिकांच्या घराचा पंचनामा तातडीने करून प्रत्येक कुटुंबास तीस हजार रुपये, 25 किलो गहू, 25 किलो तांदूळ, एक गॅस सिलेंडर मोफत देण्यात यावे अशी मागणी केली. 

यावेळी सामाजिक न्याय विभाग शहर जिल्हा उपाध्यक्ष भारत चौगुले, सौ सुरेखा हेगडे, आदर्श कांबळे, रुपेंद्र जावळे, अभिजीत रांजणे, सज्जन करट्टी, श्रीमती आलं का ताई ठोंबरे, हेमा कदम, संभाजी सरगर, अंकुश जाधव, आदी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते...

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.