Popular posts from this blog
शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.
शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी. --------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र सांगली जिल्हा प्रतिनिधी अमित पांढरे --------------------------------- सोलापूर हुन कोल्हापूर कडे येत असलेल्या क्रेटा गाडीचा शिरढोण जवळ भिषण अपघात झाला या झालेला अपघातामध्ये युवराज जाधव व व 32 राहणार पाचगाव कोल्हापूर ,सुर्यकांत जाधव व व 52 राहणार कसबा बावडा कोल्हापूर गौरी जाधव व व 35 राहणार राजारामपुरी कोल्हापूर हे तीन जण जागीच ठार झाले तर प्रशांत पांडूरंग चिले.व.व.40 रा रामानंद नगर हा गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत . शिरढोण तालुका कवठेमंकाळ जिल्हा सांगली MH-09-GF-8323 सोलापूर हुन कोल्हापूरला येत असताना क्रेटा गाडी चालकाचा स्टेरिंग वरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या मधोमध असलेल्या कटड्याला धडकल्यामुळे हा अपघात झाला या अपघाताचा पुढील तपास कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय दत्तात्रय कोळेकर हे करीत आहेत
निगडेवाडीत वह्यांचे वाटप.
निगडेवाडीत वह्यांचे वाटप. ----------------------------- गांधीनगर: प्रतिनिधी आदित्य नैनानी ----------------------------- विद्यामंदिर निगडेवाडी (तालुका करवीर )या शाळेमध्ये आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संकलित झालेल्या वह्यांचे वाटप विद्यामंदिर निगडेवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांना करण्यात आले. याप्रसंगी उचगावचे माजी सरपंच अशोक (मामा) निगडे माजी डे. सरपंच श्री अशोक बंडू निगडे (दादा) , दत्तात्रय बुजुगडे ,पत्रकार श्री.अनिल निगडे श्री. यशोधन निगडे पत्रकार श्री.विशाल घुले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.शेखर गौड, अंगणवाडी सेविका सौ.मीना सुर्यवंशी उपस्थित होते.मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक श्री.प्रकाश शामराव येडगे यांनी केले तर आभार अध्यापिका जयाली लेंडे मॕडम यांनी मानले. फोटो ओळ: विद्या मंदिर निगडेवाडी येथे वह्यांचे वाटप करण्यात आले.
Comments
Post a Comment