सातारा पोलीस भरती 2022-2023 लेखी परीक्षा महाराष्ट्र स्कुटर लिमिटेड, सी1, जुनी एम.आय.डी.सी. सातारा.415004. ह्या ठिकाणी दिनांक 26/07/2024 ह्या दिवशी होणार असून, उमेदवारांनी.

 सातारा पोलीस भरती 2022-2023 लेखी परीक्षा  महाराष्ट्र स्कुटर लिमिटेड, सी1, जुनी एम.आय.डी.सी. सातारा.415004. ह्या ठिकाणी दिनांक 26/07/2024 ह्या दिवशी होणार असून, उमेदवारांनी.

----------------------------------------

सातारा जिल्हा प्रतिनिधी

 अमर इंदलकर 

----------------------------------------

सातारा पोलीस भरती लेखी परीक्षा ही शासकीय धान्य गोदाम, ( डी एम ओ गोडाऊन)नवी एम आय डी सी. पारले कंपनी शेजारी, कोडोली सातारा 415004 येथे होणार होती. परंतु सातारा जिल्ह्यात सध्या मुसळदार पाऊस पडत असल्याने सदर लेखी परीक्षेच्या ठिकाणी लेखी परीक्षा घेणे शक्य नसल्याने, लेखी परीक्षा ठिकाणात बदल करून ती महाराष्ट्र स्कुटर लिमिटेड सी 1, जुनी एम आय डी सी सातारा 415004 ह्या ठिकाणी घेतली जाणार असून उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर 2 तास अगोदर उपस्थित राहावे अशी सूचना सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केली असून, परीक्षा केंद्राची गुगल मॅप लिंक https://maps.app.goo. gl/VAHRCDVTIEWvkAhk8 उमेदवारांना ई-मेल आय डी व मोबाईल क्रमांकवर एस एम एस द्वारे पाठवन्यात आलेली आहे. तसेच परीक्षा केंद्रविषयी काही शंका असल्यास उमेदवाराने सातारा नियंत्रण कक्ष 02162-234130 ह्या क्रमांकावर संपर्क साधावा.

Comments

Popular posts from this blog

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.