महसुल सप्ताह : 10 ऑगस्ट रोजी "सैनिक हो तुमच्यासाठी" कार्यक्रमाचे आयोजन.
महसुल सप्ताह : 10 ऑगस्ट रोजी "सैनिक हो तुमच्यासाठी" कार्यक्रमाचे आयोजन.
-------------------------------------
कोल्हापूर, प्रतिनिधी
-------------------------------------
जिल्ह्यात महसुल व वन विभागाव्दारे दिनांक 1 ऑगस्ट ते
7 ऑगस्ट 2024 या दरम्यान महसुल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत 5 ऑगस्ट रोजी होणारा "सैनिक हो तुमच्यासाठी" कार्यक्रम 10 ऑगस्ट 2024 रोजी राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सेवानिवृत्त अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीर पत्नी, वीरमाता व त्यांचे अवलंबीत माजी सैनिकांनी त्यांच्या महसुल संबधिच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी संबंधित तालुक्यातील तहसिलदार कार्यालयात निवेदन देवून आवश्यक असणारे महसुल कार्यालयाकडुन निर्गमित होणारे विविध दाखले प्राप्त करुन घ्यावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कर्नल (निवृत्त) डॉ. भिमसेन चवदार यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या आदेशानुसार दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी "सैनिक हो तुमच्यासाठी" हा कार्यक्रम तालुका स्तरावर साजरा करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शहीद सैनिकांची
वीर पत्नी, वीर माता, वीर पिता यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील सेवानिवृत्त अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीर पत्नी, वीरमाता व त्यांचे अवलंबीत यांचे महसुल संदर्भातील तक्रारींचे निराकरण प्राधान्याने करण्यात येणार आहे.
Comments
Post a Comment